Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : Joe Root ची गाडी काही थांबेना! मँचेस्टरमध्ये रचला इतिहास; ‘असे’ करणारा बनला जगातील पहिला फलंदाज

भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान जो रूटने २२ धावा पूर्ण करताच ओल्ड ट्रॅफर्डवर १००० कसोटी धावा पूर्ण करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 25, 2025 | 05:18 PM
IND vs ENG: Joe Root's car didn't stop! Created history in Manchester; Became the first batsman in the world to do 'this'

IND vs ENG: Joe Root's car didn't stop! Created history in Manchester; Became the first batsman in the world to do 'this'

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळाला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारताने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ३५८ धावा केल्या आहेत. तर प्रतिउत्तरात इंग्लंड संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा २ विकेट गमावून २२५ धावा केल्या होत्या. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने मोठा विक्रम रचला आहे. तो ओल्ड ट्रॅफर्डवर १००० कसोटी धावा पूर्ण करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या कामगिरीने रूटने इतिहसा रचला आहे.

हेही वाचा : अखेर IOA च्या CEO चा वाद संपुष्टात! क्रीडामंत्र्यांनी केली मध्यस्थी; डोपिंगच्या सामन्यासाठी पॅनेलची स्थापना

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान, जो रूटने २२ धावा पूर्ण करताच ही कामगिरी करून दाखवली आहे. या मैदानावर १००० धावां पूर्ण करण्यासाठी रूटला २२ धावांची आवश्यकता होती. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५३ व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर त्याने ही कामगिरी केली आहे. या मैदानावर जो रूटचा हा १२ वा कसोटी सामना आहे. ओल्ड ट्रॅफर्डवर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १२ कसोटी सामन्यांमध्ये रूटने एक शतक आणि सात अर्धशतके लगावली आहेत.

मँचेस्टरमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारे खेळाडू

  1. जो रूट (इंग्लंड) – १०००*
  2. डेनिस कॉम्प्टन (इंग्लंड) – ८१८
  3. माइक आथर्टन (इंग्लंड) – ७२९
  4. अ‍ॅलेक स्टीवर्ट (इंग्लंड) – ७०४
  5. लिओनार्ड हटन (इंग्लंड) – ७०१

आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान असणाऱ्या रूटला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची चांगली संधी देखील मिळणार आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीचा शेवट ६८ अर्धशतकांवर केला आहे. तर इंग्लंडसाठी रूटच्या नावावर ६६ अर्धशतके जमा आहेत. जर रूटने चौथ्या कसोटीत शतक झळकावले तर तो भारताविरुद्ध १२ कसोटी शतके करणारा जगातील एकमेव खेळाडू ठरणार आहे.

हेही वाचा : IND vs ENG : बेन स्टोक्सने मँचेस्टरमध्ये रचला इतिहास! ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या यादीत झाला सामील..

सामान्यांची स्थिती

भारताने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ३५८ धावा केल्या आहेत. तर प्रतिउत्तरात इंग्लंड संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा २ विकेट गमावून २२५ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी मैदानावर जो रूट आणि ओली पोप टिकून आहे. जो रूट ४५ तर पोप ६२ धावांवर खेळत आहे. इंग्लडच्या २ बॅड ३१० धावा झालेल्या आहेत.

Web Title: Joe root becomes first player in world to score 1000 test runs at old trafford

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Joe Root

संबंधित बातम्या

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
1

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

तो केवळ छक्के-चौके मारत नाही, तर डान्सही करतो! हिटमॅन रोहित शर्मा रितिकासोबत स्टेजवर थिरकला; पहा व्हिडिओ
2

तो केवळ छक्के-चौके मारत नाही, तर डान्सही करतो! हिटमॅन रोहित शर्मा रितिकासोबत स्टेजवर थिरकला; पहा व्हिडिओ

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक
3

IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक

IND Vs ENG : ‘खेळायचं की नाही, स्वत:च्या मर्जीनुसार…’ माजी कर्णधाराने जसप्रीत बुमराहचे टोचले कान..
4

IND Vs ENG : ‘खेळायचं की नाही, स्वत:च्या मर्जीनुसार…’ माजी कर्णधाराने जसप्रीत बुमराहचे टोचले कान..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.