Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जो रूटने तर आमच्यावर बलात्कार केला’…पाकिस्तानी दिग्गजाचे वादग्रस्त वक्तव्य; मुलतान कसोटीवर धक्कादायक विधान

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात मुलतान येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाला एक डाव आणि ४७ धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात इंग्लंडचा महान फलंदाज जो रूट आणि हॅरि ब्रूकने विक्रमी भागीदारी केली. हॅरि ब्रूकने 317 धावा तर जो रूटने 262 धावांची संस्मरणीय खेळी खेळली, ज्याच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 823 धावा केल्या, जे विजयासाठी पुरेसे होते.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 11, 2024 | 10:25 PM
England's Joe Root created history

England's Joe Root created history

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan vs England 1st Test : मुलतान कसोटीतही पाकिस्तानी संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. नुसता पराभव नाही तर कसोटी क्रिकेटचा १४७ वर्षांचा इतिहास बदलून टाकणारा पराभव. पहिल्या डावात 500 धावा करूनही प्रथमच संघाला पराभवाचा सामना करावा लागला, तोही एक डाव आणि 47 धावांच्या फरकाने. पाकिस्तानी संघाच्या पराभवानंतर नेहमीप्रमाणेच, देशातील उपस्थित चाहते आणि तज्ज्ञांकडून शाब्दिक हल्ले तीव्र होतात परंतु पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफ यांनी जे म्हटले आहे तसे क्वचितच कोणी बोलले असेल. संघाच्या पराभवानंतर रशीद लतीफने इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटच्या शानदार द्विशतकाबद्दल बोलताना त्याने पाकिस्तानी संघावर बलात्कार केल्याचे सांगितले.

पाकिस्तानच्या प्रथम फलंदाजी करताना 556 धावा 

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 556 धावा केल्या होत्या, त्यानंतर इंग्लंडने त्याची चांगलीच धुलाई केली आणि 823 धावा करत डाव घोषित केला. हॅरी ब्रूक आणि जो रूटने इंग्लंडला इथपर्यंत नेले, ज्यांनी 454 धावांची विक्रमी भागीदारी केली. हॅरी ब्रूकने संस्मरणीय त्रिशतक झळकावले, तर रुटने कारकिर्दीतील सहावे द्विशतक झळकावले. या काळात रुटने २६२ धावा केल्या तर ब्रुक ३१७ धावा करून बाद झाला. दोन्ही फलंदाजांनी मिळून पाकिस्तानी गोलंदाजांची दमछाक केली.
‘जो रूटने तुझ्यावर बलात्कार केला आहे’

पाकिस्तानी संघाच्या स्थितीवर सातत्याने टीका

तेथील तज्ज्ञ वेगवेगळ्या टीव्ही आणि यूट्यूब शोमध्ये पाकिस्तानी संघाच्या स्थितीवर सातत्याने टीका करत आहेत. अशाच एका प्रसिद्ध शोमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज यष्टीरक्षक रशीद लतीफने आपल्या वक्तव्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. ‘कॉट बिहाइंड’ नावाच्या या यूट्यूब चॅनलवरील चर्चेदरम्यान, जो रूटच्या खेळीची चर्चा झाली तेव्हा रशीद लतीफ थेट म्हणाला – ‘जो रूटने तुझ्यावर बलात्कार केला आहे’. लतीफचे हे शब्द ऐकून त्याच्यासोबत उपस्थित तज्ज्ञांनाही धक्का बसला.
लतीफ असं का बोलला?

या व्हिडिओचा हा छोटासा भाग आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक रशीद लतीफ तसेच पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवत आहेत. लतीफच्या या धक्कादायक विधानावरही यूजर्स आक्षेप घेत आहेत. तथापि, रशीद लतीफने त्याचा अर्थही स्पष्ट केला आणि सांगितले की रूटने वारंवार रिव्हर्स-स्वीप मारून पाकिस्तानला कसे त्रास दिला. त्याने असेही सांगितले की, पाकिस्तानी खेळाडूंना 90 धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी आणि शतक गाठण्यासाठी खूप वेळ लागत होता, तर रुट आणि ब्रूक यांना 90 धावांचे शतकात रूपांतर करण्यासाठी जास्त वेळ लागला नाही आणि 190 धावांपर्यंत पोहोचल्यानंतरही त्यांनी तेच केले. रुट आणि ब्रूक खूप मस्ती करत खेळले आणि त्यांनी हवे तेव्हा स्वीप, रिव्हर्स-स्वीप आणि स्कूप शॉट्स खेळून पाकिस्तानचे क्रिकेट उद्ध्वस्त केले, असे लतीफने सांगितले.

 

Web Title: Joe root has raped pakistani legend rashid latif speaks harshly gives shocking statement on multan test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 10:25 PM

Topics:  

  • cricket
  • England
  • Pakistani team

संबंधित बातम्या

IND vs SA U19  Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाची कमान Vaibhav Suryavanshi कडे! वाचा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
1

IND vs SA U19 Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाची कमान Vaibhav Suryavanshi कडे! वाचा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

हरमनप्रीत कौर रागाने संतापली, मैदानाच्या मध्यात या खेळाडूवर भडकली! नक्की कारण काय? Video Viral
2

हरमनप्रीत कौर रागाने संतापली, मैदानाच्या मध्यात या खेळाडूवर भडकली! नक्की कारण काय? Video Viral

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट
3

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट

स्मृती मानधनाने नवा विक्रम केला नावावर, 10000 धावा करणारी चौथी महिला! मिताली राजचा रेकाॅर्ड मोडण्याचा मार्गावर…
4

स्मृती मानधनाने नवा विक्रम केला नावावर, 10000 धावा करणारी चौथी महिला! मिताली राजचा रेकाॅर्ड मोडण्याचा मार्गावर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.