
india vs west indies 2nd odi
वेस्ट इंडिजची फलंदाजी
वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेल आणि कीसी कार्टीने डावाची सुरुवात केली होती. कीसी कार्टी केवळ 9 रन्सची खेळी करून आउट झाला. मात्र त्यानंतर कर्णधार जॉन कॅम्पबेल, शाई होप यांनी शानदार शतकी खेळी केली. या दोघांनी केलेल्या आक्रमक आणि शानदार फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले.
IND Vs WI: जॉन कॅम्पबेलने काढली भारताची पिसं; केवळ 65 बॉल्समध्ये ठोकले खणखणीत शतक
जॉन कॅम्पबेल 101 रन्स तर शाई होप 104 रन्स करून आउट झाला. अमीर जांगूने देखील शतकी खेळी केली. शेरफेन रदरफोर्ड शून्यावर आउट झाला. जॉन कॅम्पबेलने आणि कीसी कार्टीने वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात केली. कीसी कार्टी केवळ 9 रन्स करून आउट झाला. तर जॉन कॅम्पबेलने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने खणखणीत शतक ठोकले.
भारतीय संघाची गोलंदाजी
भारतीय गोलंदाजांना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सुरुवातीचे 30 ओव्हर्स जास्त विकेट्स मिळू दिल्या नाहीत. तीन फलंदाजांनी शानदार शतकी खेळी केली. दरम्यान प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट पटकावली आणि भारताला यश मिळवून दिले.गूरनूर ब्रारने देखील 2 विकेट्स घेतल्या आणि वेस्ट इंडिजच्या धावसंख्येला थोडासा यावर घालण्याचा प्रयत्न केला. स्पिनर्सने देखील चांगली गोलंदाजी करत कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.
घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया
वेस्ट इंडिज: जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्ह्स, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार आणि विकेटकीपर), अमीर जांगू, ज्वेल अँड्र्यू, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडन सील्स.