ऋषभ पंत (फोटो- ians)
भारतीय संघाचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने नुकत्याच एका पॉडकास्ट दरम्यान वनडे क्रिकेटमधून आणि टी 20 संघातून वगळले गेले, त्यावर भाष्य केले आहे. संघात स्थान न मिळाल्याची खंत व्यक्त करतानाच, एक खेळाडू म्हणून मिळालेल्या प्रत्येक अपयशानंतर पुन्हा खंबीरपणे उभे राहणे कसे गरजेचे असते, हे त्याने स्पष्ट केले.
Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
वनडे संघात स्थान न मिळाल्याच्या गोष्टीवर बोलताना ऋषभ पंत म्हणाला, ‘तुम्हाला संघात स्थान मिळत नाही तेव्हा वाईट नक्कीच वाटते. मात्र जेव्हा जेव्हा मोठा धक्का बसतो किंवा अपयश येते, तेव्हा तिथूनच एक जोरदार पुनरागमन करण्याची संधी मिळत असते अथवा टी निर्माण करावी लागते. खेळाडूंना अशा चढ-उतारांना सामोरे जावेच लागते.’
ऋषभ पंतच्या या वक्तव्यावरून त्याचा आत्मविश्वासी दृष्टिकोन स्पष्ट दिसून येतो. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तो कठोर परिश्रम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
भारतीय संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सध्या इराणी कप स्पर्धेत ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाचे नेतृत्व करत आहे. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी आपला फॉर्म कायम राखणे हेच ऋषभ पंतचे मुख्य लक्ष्य असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघ लवकरच न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची सिरिज खेळणार आहे. या सिरिजच्या दृष्टीने इराणी कपमधील सहभाग पंतसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कसोटी क्रिकेटच्या आव्हानात्मक वातावरणात जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे, लांब खेळी खेळणे आणि सामना जिंकवून देण्याची क्षमता सिद्ध करणे, यावर त्याचा भर असणार आहे.






