फोटो सौजन्य - johnn.cenna
जॉन सीना निवृत्त : वर्ल्ड सेन्सेशन जॉन सीना हा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. जागतिक कुस्ती मनोरंजनामध्ये महान कुस्तीपटूंपैकी एक आहे. त्याला या खेळामुळे जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे. त्याने शनिवारी त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने मनी इन द बँक २०२४ कार्यक्रमात येऊन जॉन सीनाने डब्ल्यूडब्ल्यूईला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. टोरंटो (कॅनडा) येथे झालेल्या कार्यक्रमात त्याने आपला शेवटचा सामना कधी लढणार हे जाहीर केले आहे.
जॉन सीनाला या खेळाडूचे रिंग मास्टर म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूईच्या महान कुस्तीपटूंपैकी एक आहे. त्याने त्याच्या करियरची सुरुवात २००० मध्ये केली होती. २७ जून २००२ मध्ये त्याने पदार्पण केले होते. २२ वर्षे त्याने WWE मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर आता त्याने त्याच्या करियरला अलविदा करण्याचे ठरवले आहे.
जॉन सीनाने आतापर्यत १६ वेळा वर्ल्ड चॅम्पियन झाला आहे. जॉन सीनाला त्याच्या खेळाने त्याचबरोबर त्याच्या व्यक्तिमत्वाने जगभरामध्ये पसंती मिळाली. तरुण चाहते अजूनही त्याला त्यांचा सुपरहिरो म्हणून पाहतात.
WWE हॉल ऑफ फेमर ट्रिश स्ट्रॅटसने जॉन सीनाची ओळख करून दिली. रिंगणात प्रवेश करताच त्यांनी सांगितले की, मी आपल्या निवृत्तीबद्दल सर्वांना सांगण्यासाठी येथे आलो आहे, परंतु हे ऐकून रिंगणात उपस्थित सुमारे १९,००० लोक निराश झाले. या दिग्गज कुस्तीपटूने सांगितले की, त्याच्या निवृत्तीवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतील, पण खऱ्या चाहत्यांनी त्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे. जॉनने सांगितले की पुढच्या वर्षी नेटफ्लिक्सवर रॉ शो येणार आहे आणि तो त्याच्या डेब्यू शोमध्ये देखील उपस्थित असेल.
जॉन सीना पुढे म्हणाला की, तो रॉयल रंबल २०२५ मध्ये येऊ शकतो आणि त्यानंतर तो एलिमिनेशन चेंबर २०२५ मध्ये देखील येऊ शकतो. पण रेसलमेनिया ४१ हा शेवटचा कार्यक्रम असेल जिथे जॉन सीना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना लढवेल. त्याच्या डोळ्यातून अश्रू होते आणि आवाजातही वेदना जाणवत होत्या.