Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरॉन पोलार्डचा वयाच्या 38 व्या वर्षी मैदानावर कहर! CPL मध्ये ठोकले सर्वात जलद अर्धशतक, पहा Video

अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) २०२५ मध्ये फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे.  ट्रिनबागो नाईट रायडर्सचा भाग असलेल्या पोलार्डने गयाना अमेझॉन वॉरियर्सविरुद्ध तुफानी अर्धशतक झळकावले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 07, 2025 | 11:46 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

दुबईमध्ये सुरु होणाऱ्या आशिया कपची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे तर दुसरीकडे कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये करत असलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे. यामध्ये आतंरराष्ट्रिय संघामधील अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. वेस्टइंडिजच्या संघाचे खेळाडू हे त्याच्या ताकदीच्या खेळामुळे त्याचबरोबर त्याच्या रेकाॅर्डमुळे ओळखले जातात. वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड देखील या लीगमध्ये सामील झाला आहे आणि तो त्याच्या वयाच्या 38 व्या वर्षी कमालीची कामगिरी करत आहे.

वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) २०२५ मध्ये फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे.  ट्रिनबागो नाईट रायडर्सचा भाग असलेल्या पोलार्डने गयाना अमेझॉन वॉरियर्सविरुद्ध तुफानी अर्धशतक झळकावले. पोलार्डने १८ चेंडूत नाबाद ५४ धावा ६ सप्टेंबर रोजी गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर केल्या, ज्यामध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. ३८ वर्षीय पोलार्डने अवघ्या १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

सीपीएलमधील हे त्याचे सर्वात जलद अर्धशतक आहे. त्याचबरोबर, एकूण यादीतील हे संयुक्तपणे तिसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. एविन लुईस आणि डेव्हिड मिलर यांनीही १७-१७ चेंडूत अर्धशतक झळकावले आहेत. सीपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम आंद्रे रसेलच्या नावावर आहे (१४ चेंडूत). त्याच्या पाठोपाठ जेपी ड्युमिनी (१५ चेंडूत) आहे.

Kieron Pollard brings up his fifty in scintillating style! 🔥#CPL25 #CricketPlayedLouder#BiggestPartyInSport #GAWvTKR #RepublicBank pic.twitter.com/zGBFFKkrRF

— CPL T20 (@CPL) September 7, 2025

पोलार्डने ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या डावाच्या शेवटच्या षटकात रोमारियो शेफर्डला फाडून टाकले. त्याने २० व्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग षटकार मारले आणि नंतर पाचव्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकारही मारला. पोलार्डने सीपीएलच्या चालू हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावले आहे. पोलार्डने १ सप्टेंबर रोजी सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सविरुद्ध २९ चेंडूत ६५ धावा आणि २३ ऑगस्ट रोजी सेंट लुसिया किंग्जविरुद्ध २९ चेंडूत ६५ धावा केल्या.

Asia Cup 2025 Final : भारताच्या हाॅकी संघाचा मुकाबला होणार दक्षिण कोरीयाशी, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

मात्र, पोलार्डची धमाकेदार खेळी व्यर्थ गेली. १६७/५ धावा करूनही ट्रिनबागो नाईट रायडर्सना तीन विकेटनी पराभव पत्करावा लागला. गयाना अमेझॉन वॉरियर्सने एक चेंडू शिल्लक असताना विजयाचा झेंडा फडकावला. त्यांच्याकडून शाई होपने सर्वाधिक धावा केल्या. होपने ४६ चेंडूत ५४ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि तेवढेच षटकार निघाले. शिमरॉन हेटमायरने ३० चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांसह ४९ धावांची खेळी केली. ड्वेन प्रिटोरियसने १४ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या, ज्यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता. गुडाकेश मोतीने विजयी धावा केल्या. तो ६ चेंडूत पाच धावा करून नाबाद परतला.

Web Title: Kieron pollard wreaks havoc on the field at the age of 38 hits the fastest fifty in cpl watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • CPL 2025
  • cricket
  • Kieron Pollard
  • Sports

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 Final : भारताच्या हाॅकी संघाचा मुकाबला होणार दक्षिण कोरीयाशी, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming
1

Asia Cup 2025 Final : भारताच्या हाॅकी संघाचा मुकाबला होणार दक्षिण कोरीयाशी, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

Asia Cup 2025 : जितेश शर्मा नाही तर हा खेळाडू खेळणार पाचव्या क्रमांकावर…इरफान पठाणने आशिया कपसाठी निवडली Playing 11
2

Asia Cup 2025 : जितेश शर्मा नाही तर हा खेळाडू खेळणार पाचव्या क्रमांकावर…इरफान पठाणने आशिया कपसाठी निवडली Playing 11

BCCI च्या बँक बॅलन्समध्ये किती पैसे आहेत? आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का! 5 वर्षात 14000 कोटी…वाचा सविस्तर
3

BCCI च्या बँक बॅलन्समध्ये किती पैसे आहेत? आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का! 5 वर्षात 14000 कोटी…वाचा सविस्तर

PHOTO: भारताचा संघ आशिया कपसाठी सज्ज! कोणाला मिळणार Playing 11 मध्ये जागा?
4

PHOTO: भारताचा संघ आशिया कपसाठी सज्ज! कोणाला मिळणार Playing 11 मध्ये जागा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.