फोटो सौजन्य - सोशल मिडिया (Hockey India)
भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशिया कप मध्ये एकही सामना न गमावता फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताच्या संघाचा फायनल मध्ये सामना हा दक्षिण कोरियाशी होणार आहे. हॉकी आशिया कप २०२५ च्या अंतिम फेरीतील संघांचा निर्णय झाला आहे. भारतीय संघ सुपर-४ मध्ये अव्वल स्थानावर राहिला. तर कोरियन संघाने ३ पैकी १ सामना जिंकला आणि संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. आता अंतिम सामना टॉप-२ संघांमध्ये खेळवला जाईल.
अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला विश्वचषकात थेट प्रवेश मिळेल. भारतीय संघाने आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. अशा परिस्थितीत, हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाला ही विजयी मालिका कायम ठेवायची आहे. अंतिम सामना कधी आणि कुठे खेळला जाईल यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. तसेच, तुम्ही सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि थेट प्रक्षेपण कसे पाहू शकता.
भारत विरुद्ध कोरिया यांच्यामध्ये होणारा आशिया कप फायनल चा सामना हा 7 सप्टेंबर रोजी रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामना बिहार मधील राजगीर येथील विहार स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी हॉकी स्टेडियम मध्ये रंगणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणारा अंतिम सामना हा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे.
भारत विरुद्ध कोरिया यांच्यामध्ये होणाऱ्या फायनलच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे टेलिव्हिजनवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग ही सोनी लिव ॲप वर प्रेक्षक पाहू शकतात.
𝐆𝐫𝐚𝐧𝐝 𝐅𝐢𝐧𝐚𝐥𝐞 𝐓𝐢𝐦𝐞!🏆
INDIA 🆚 KOREA
🕰: 7:30 PM IST
📺: Sony TEN 1 & Sony LIV#HockeyIndia #IndiaKaGame #HumseHaiHockey #HeroAsiaCupRajgir | @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI @WeAreTeamIndia @BSSABihar @asia_hockey @13harmanpreet pic.twitter.com/0yaL92k8Ct— Hockey India (@TheHockeyIndia) September 7, 2025
भारतीय संघाने आतापर्यंत ३ वेळा आशिया कपचे विजेतेपद जिंकले आहे. याशिवाय भारत आणि कोरिया यांच्यात ३ वेळा अंतिम सामना खेळला गेला आहे. १९९४ मध्ये कोरियाने विजय मिळवला. २००७ मध्ये भारताने या पराभवाचा बदला घेतला. २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कोरियाने भारताचा पराभव केला. अशा परिस्थितीत आता हरमनप्रीत सिंगकडे या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.