KKR vs RCB: IPL 2025 restarted with a big hurdle! The match between RCB and KKR is in jeopardy..
KKR vs RCB : ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल २०२५ एक आठवड्यासाठी स्थगित केले होते. ते आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आज, १७ मे रोजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडणार आहे. पण सामन्यापूर्वीच या सामन्यावर काळे ढग दाटून आले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी अडचण निर्माण झाली. शनिवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या बेंगळुरू आणि कोलकाता सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बेंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाऊस आल्यास हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. यानंतर, दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात येतील. जर पाऊस येऊन सामना रद्द झाला तर आरसीबी संघ प्लेऑफसाठी पत्र ठरेल तर केकेआरला स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे. जर पाऊस थोडा वेळ राहिला तर या सामन्यातील षटकांची संख्या कमी करण्यात येऊ शकते.
हेही वाचा : क्रीडा विश्वात चमत्कार! Ben Foakes चा ‘त्या’ जादुई झेलने मैदनावरील खेळाडू देखील झाले अवाक्; पाहा VIDEO
आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्यादरम्यान जोरदार वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत बेंगळुरूमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कर्नाटकात काही ठिकाणी जोरदार वादळासोबतच गारपीट होण्याची शक्यता देखील आहे.
दोन्ही संघांमध्ये एकूण ३५ सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये केकेआरने २० सामने आपल्या नावावर केले आहेत. तर आरसीबीने १५ सामने जिंकले आहेत. आरसीबी संघ हा आकडा सुधारण्याचा प्रयत्न करेल. आरसीबीच्या कामगिरीकडे पाहता, हा आकडा कमी करण्यात ते यशस्वी होईल असे दिसते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य खेळी 11: फिल सॉल्ट, मयंक अग्रवाल, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, रसिक सलाम/लुंगी एनगिडी, यश दयाल
कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य खेळत 11: सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), अंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे/व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, वैभव चर्बोरा, अनुकुल रॉय