जोश हेझलवूड(फोटो-सोशल मिडिया)
RCB vs KKR : भारत पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ एक आठवडा स्थगित केले होते. आजपासून(१७ मे) आयपीएल पुन्हा सुरू होत आहे. अशातच आरसीबी संघाबाबत एक बातमी समोर आली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या स्पर्धेपूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संचालक मो बोबट म्हणाले की, कर्णधार रजत पाटीदार त्याच्या बोटाच्या दुखापतीतून वेगाने ठीक होत आहे, तर जोश हेझलवूड दुखापतीमुळे तो संघात परतणार नाही. तो आपल्या मायदेशी गेला आहे.
बोबॅट म्हणाला की रजतचे बोट सद्या ठीक आहे. त्याच्या हाताला दुखापत झाली होती पण तो हळूहळू बरा होत आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीमुळे आयपीएल थांबवण्यात आले होते, त्यामुळे त्याला लवकर बरे होण्यासाठी अधिक वेळ मिळाला आणि त्यामुळे तो लवकर बरा होत आहे, त्याची सूज कमी होत असून तो पुन्हा हातात बॅट धरत असल्याचे बोबॅट यांनी सांगितले.
हेही वाचा : क्रीडा विश्वात चमत्कार! Ben Foakes चा ‘त्या’ जादुई झेलने मैदनावरील खेळाडू देखील झाले अवाक्; पाहा VIDEO
आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोबट बोलत होते तेव्हा ते म्हणाले की, रजत गेल्या काही दिवसांपासून सराव करत आहे आणि दुखापतीतून सावरत आहे. त्याची सूजही आता बरीच कमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी खेळवण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पाटीदारला दुखापत झाली होती.
गुरुवार आणि शुक्रवारी पाटीदार कोणत्याही संरक्षक पट्ट्या न वापरता नेटमध्ये फलंदाजी करताना दिसून आला. त्यानंतर त्याच्या केकेआरविरुद्ध खेळण्याच्या शक्यताही वाढल्या आहेत. तो कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एक प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
बोबॅट पुढे म्हणाले की जोश हेझलवूड अद्याप संघात सामील झालेला नाही. तो खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. त्याने म्हटले आहे की तो हेझलवुडच्या अपडेटबाबत ऑस्ट्रेलिया क्रिकेटशी बोलत आहे. याशिवाय त्याने असेही म्हटले की हेझलवूड संघात हा काही एकमेव नाही. इतर सर्व खेळाडू संघासोबत उपस्थित आहेत.
आयपीएल २०२५ च्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे, खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे आयपीएल फ्रँचायझींना नवीन रणनीती आखावी लागत आहे. राष्ट्रीय जबाबदारीमुळे ज्या कारणांमुळे खेळाडूंना संघ सोडून जावं लागणार आहे. त्यामध्ये आरसीबी संघातील जेकब बेथेल आणि लुंगी एनगिडी यांचा समावेश आहे.