KKR vs SRH: Sunil Narine creates world record for KKR! Bhim becomes the first bowler in the world to achieve such a feat..
KKR vs SRH : आयपीएल २०२५ च्या ६८ व्या सामन्यात सनराजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा ११० धावांनी पराभव केला. या सामन्यात एसआरएचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २७८ धावांचा डोंगर उभा केला होता. क्लासिनचे शतक आणि हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर एसआरएचने २७८ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्स सर्वबाद १६८ धावाच करू शकला. परिणामी एसआरएचने ११० धावांनी विजय मिळवला. जरी केकेआरचा पराभव झाला असाल तरी संघाचा अनुभवी गोलंदाज सुनील नारायणने इतिहास रचला आहे. सुनील नारायण टी-२० क्रिकेटमध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १ विकेट घेताच नारायणने हा विक्रम केला.
सुनील नरेनने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना आता २१० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याने पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आहे. त्याने इंग्लंडच्या समित पटेलला मागे टाकले आहे. पटेलने यापूर्वी नॉटिंगहॅमशायरकडून खेळताना २०८ बळी घेऊन हा विक्रम रचला होता.
सुनील नारायणने अभिषेक शर्माला बाद करून आपला पहिला बळी मिळवला. त्यानंतर त्याने हेडला आपली दुसरी शिकार बनवले. नारायणने ४ षटकांत ४२ धावा देत २ बळी टिपले. त्याने पहिल्या दोन विकेट घेतल्या होत्या.
आयपीएलमध्ये नरेनचा सर्वात जवळचा प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आहे, ज्याने फ्रँचायझीसोबतच्या त्याच्या शानदार कामगिरी करत कारकिर्दीत १९५ बळी टिपले आहेत. मलिंगा हा बऱ्याच काळापासून लीगमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. त्याने आयपीएलमधून कधीच निवृत्ती घेतली आहे.
सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी गमावून २७८ धावांचा डोंगर उभा केला. संघाचा स्टार खेळाडू हेनरिक क्लासेनने ३९ चेंडूत १०५ धावांची नाबाद खेळी केली. त्याने त्याच्या खेळीत ९ षटकार आणि ७ चौकार लगावले. त्याच्या खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ३ गडी गमावून २७८ धावा उभ्या केल्या. तसेच ट्रॅव्हिस हेडने देखील ७६ धावांची खेळी केली. कोलकाताकडून नारायणने २ आणि वैभव अरोराने १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात कोलकाता संघ १६८ धावाच करू शकला.