RCB vs DC: KL Rahul is becoming the king of the white ball format, strong performance in IPL..
RCB vs DC : एकेकाळी संघाला आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या केएल राहुलने चॅम्पियन्स ट्रॉफी ते आयपीएलपर्यंत ज्या प्रकारे आपले नशीब बदलले आहे, ते फक्त त्याच्यासारख्या तांत्रिक कौशल्य असलेल्या फलंदाजालाच शक्य आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या आयपीएल सामन्यात चिन्नास्वामीच्या अवघड खेळपट्टीवर १७५ च्या स्ट्राईक रेटने ५३ चेंडूत नाबाद ९३ धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्सला सहा विकेटने विजय मिळवून दिला. त्याचे अर्धशतक जोखीममुक्त होते ज्यामध्ये त्याने २९ चेंडूत २९ धावा केल्या आणि नंतर उर्वरित ६४ धावा फक्त २४ चेंडूत बनवल्या होत्या. कर्नाटकचा असल्याने, तेथील परिस्थितीशी परिचित असल्याने त्याला जलद धावा काढण्यास मदत झाली असे म्हणणे सोपे आहे. हे घडले असेल, पण हे एकमेव कारण नाही. त्याने एका षटकात २२ धावा काढून सामनाच उलटा केला.
हेही वाचा : LSG vs GT : निकोलस पूरन-मोहम्मद सिराज यांच्यात रंगणार घमासान! आयपीएलमध्ये आज लखनौ-गुजरात आमनेसामने..
तो त्याच्या तांत्रिक कौशल्याच्या जोरावर दिल्ली संघाच्या फलंदाजीचा केंद्रबिंदू बनला आहे. गुरुवारी, त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की संघाचा त्याच्यावरील विश्वास चुकीचा नाही. त्याने १५ व्या षटकात जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर तीन चौकार आणि एका षटकारासह २२ धावा काढत सामना दिल्लीच्या बाजूने वळवला. आरसीबीचे मार्गदर्शक दिनेश कार्तिक यांनी राहुलच्या खेळीचे कौतुक केले आणि सांगितले की टी-२० मध्ये वेगवेगळ्या स्थानांवर फलंदाजी करणे सोपे नाही, परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने आपली छाप सोडली आहे.
काही काळापासून हे खूप चांगले केले आहे. मला वाटते की तो एक उच्च दर्जाचा मधल्या फळीचा फलंदाज आहे.
तो म्हणाला की त्याच्याकडे नेहमीच कौशल्य होते पण आता तो अधिक स्वातंत्र्याने खेळत आहे. त्याला पाहून बरं वाटतं.
आरसीबीला त्याच्या बालेकिल्ल्यात हरवल्यानंतर त्याने मैदानावर वर्तुळ बनवून आणि मध्यभागी बॅट मारून ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले त्यावरून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो आपली प्रतिभा सिद्ध करण्यात यशस्वी झाला आहे, हे सिद्ध होते. तो नंतर असेही म्हणाला की हे माझे घरचे मैदान आहे आणि मला ते इतरांपेक्षा चांगले माहित आहे.
हेही वाचा : जेम्स अँडरसनला मिळाला इंग्लंडचा सर्वात मोठा सन्मान, करण्यात आली मोठी घोषणा
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज केएल राहुलने शानदार खेळी करत डिसीला विजय मिळवून दिला. राहुलने ५३ चेंडूचा सामना करत ९३ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ६ षटकार लगावले. केएल राहुलने सलग दुसऱ्यांदा अर्धशतक झळकावले असून त्याने दिल्लीसाठी सलग दोन सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले आहे.
आयपीएल २०२५ च्या 18 व्या हंगामातील २४ वा सामना काल म्हणजे १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबी संघाला आपल्या घरच्या मैदनावर आताच नाही तर बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहे. या सामन्यात देखील बेंगळुरू संघ खूप संघर्ष करताना दिसून आला. सामन्याच्या चांगल्या सुरुवातीनंतर देखील आरसीबीला मोठ्या धावसंखेपर्यंत पोहचता आले नाही. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने दिल्लीसमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रतिउत्तरात केएल राहुलच्या दमदार अर्धशतकाच्या जोरवार दिल्लीने हे लक्ष्य सहज पूर्ण केले.