Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nicholas Pooran: नाईट रायडर्सने कर्णधारपदी निकोलस पूरनची निवड; ड्वेन ब्राव्हो मुख्य प्रशिक्षक

CPL 2025: कॅरिबियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये ट्रिनबागो नाईट रायडर्सने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि या हंगामासाठी निकोलस पूरनला त्यांचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 14, 2025 | 09:58 PM
Nicholas Pooran: नाईट रायडर्सने कर्णधारपदी निकोलस पूरनची निवड; ड्वेन ब्राव्हो मुख्य प्रशिक्षक
Follow Us
Close
Follow Us:

Nicholas Pooran Captain: कॅरिबियन प्रीमियर लीग २०२५ (CPL 2025) चा हंगाम सुरू होण्याआधी, स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ट्रिनबागो नाईट रायडर्स (Trinbago Knight Riders) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) याची संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी, कॅरिबियन क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) संघाचे नेतृत्व करत होता. याशिवाय, वेस्ट इंडिजचा अनुभवी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

A new sun rises over TKR as 𝐂𝐚𝐩𝐭𝐚𝐢𝐧 𝐏𝐨𝐨𝐫𝐚𝐧 leads us into the future. 👑 Kieron Pollard | Nicholas Pooran | #WeAreTKR | #TrinbagoKnightRiders pic.twitter.com/qrH1VLXh8r — Trinbago Knight Riders (@TKRiders) August 14, 2025


निकोलस पूरन यांने गेल्या ६ हंगामात ट्रिनबागो नाईट रायडर्सचे सतत नेतृत्व करणाऱ्या किरॉन पोलार्डची जागा घेतली आहे. पोलार्डच्या नेतृत्वाखाली हा संघ २०२० मध्ये सीपीएल चॅम्पियनही बनला. दुसरीकडे, ड्वेन ब्राव्हो यांनी फिल सिमन्सच्या जागी मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. सिमन्स आता बांगलादेश क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत.

पूरनसाठी कर्णधारपद एक मोठी संधी

ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर निकोलस पूरनने आपला आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “या फ्रँचायझीचे नेतृत्व करणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ही एक मोठी संधी आहे आणि मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, माझ्या संघात पोलार्डसोबतच सुनील नारायण आणि आंद्रे रसेल सारखे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांचा अनुभव मैदानावर मला योग्य निर्णय घेण्यासाठी खूप मदत करेल.” निकोलस पूरनने वयाच्या १७ व्या वर्षी सीपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि तेव्हापासून तो या लीगचा एक महत्त्वाचा भाग आहे.

IPL 2025 : मिस्टर 360 की Nicholas Pooran, कोण फलंदाज उत्तम? टी-२० आणि IPL च्या आकडेवारीने दिले ‘हे’ उत्तर.. 

निकोलस पूरनची सीपीएलमधील कामगिरी

निकोलस पूरन याची गणना सीपीएलमधील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते.

त्याने आतापर्यंत ११४ सामन्यांमध्ये २४४७ धावा केल्या आहेत.

त्याचा स्ट्राइक रेट १५२.१७ असून, त्याने अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या आहेत.

ट्रिनबागो नाईट रायडर्स (Trinbago Knight Riders) त्यांचा सीपीएल २०२५ मधील पहिला सामना १७ ऑगस्ट रोजी सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स विरुद्ध खेळणार आहे.

Web Title: Knight riders appoint nicholas pooran as captain dwayne bravo as head coach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 09:56 PM

Topics:  

  • CPL 2025
  • Nicholas Pooran
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

शाहरुख बनला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता… शे-पाचशे कोटींचा विषय नाही! मग किती आहे किंग खानची संपत्ती?
1

शाहरुख बनला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता… शे-पाचशे कोटींचा विषय नाही! मग किती आहे किंग खानची संपत्ती?

71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!
2

71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!

किरॉन पोलार्डचा वयाच्या 38 व्या वर्षी मैदानावर कहर! CPL मध्ये ठोकले सर्वात जलद अर्धशतक, पहा Video
3

किरॉन पोलार्डचा वयाच्या 38 व्या वर्षी मैदानावर कहर! CPL मध्ये ठोकले सर्वात जलद अर्धशतक, पहा Video

फक्त अभिनय नव्हे तर अभ्यासातही होता बादशाह! शाहरुखने केली होती ‘ही कठीण परीक्षा पास
4

फक्त अभिनय नव्हे तर अभ्यासातही होता बादशाह! शाहरुखने केली होती ‘ही कठीण परीक्षा पास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.