सूर्यकुमार यादव आणि निकोलस पूरन(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम अर्ध्यावर आला असून आतापर्यंत ४२ सामने पार पडले आहेत. गुणतालिकेत देखील मोठे उलटफेर बघायला मिळत आहेत. अशातच खेळाडूंमध्ये देखील स्पर्धा रंगली आहे. त्यातच मिस्टर ३६० म्हणून ज्याला ओळखले जाते, तो म्हणजे सूर्यकुमार यादव हा भारतासाठी टी-२० मधील सर्वात धोकादायक फलंदाज मानला जातो. टी-२० फॉरमॅटमध्ये कधीही सामना एकहाती फिरवण्याची क्षमता सूर्याकडे आहे. त्याच वेळी, कॅरिबियन खेळाडू निकोलस पूरन देखील टी-२० फॉरमॅटमधील तगडा फलंदाज मनाला जातो. आयपीएल २०२५ मध्ये त्याचा कहर बघायला मिळत आहे. या वर्षी तो लखनऊ सुपर जायंट्सकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरत असतो. त्याने आयपीएल २०२५ मध्ये अनेक स्फोटक खेळी खेळून संघाला विजयी केले आहे.
तसेच, सूर्यकुमार यादव देखील आयपीएल २०२५ गाजवत आहे. त्याचाय बॅटमधून देखील खोऱ्याने धावा निघत आहेत. याशिवाय, या वर्षी या दोघांमध्ये देखील ऑरेंज कॅपसाठी चांगलीच स्पर्धा रंगली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, या दोघांमध्ये नेमका कोण चांगला फलंदाज आहे? जाणून घेऊया त्यांची टी-२० मधील आकडेवाडी.
हेही वाचा : IPL 2025 : आता Babar Azam ला विसरा, Virat Kohli च ठरला ‘टी-20 किंग’, ‘या’ बाबतीत बनला जगातील नंबर-१ फलंदाज..
सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादवला मिस्टर ३६० म्हणून देखील ओळखले जाते. आतापर्यंत त्याने एकूण १५९ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने ३३ च्या सरासरीने आणि १४७ च्या स्ट्राईक रेटने ३,९६७ धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच वेळी, टी-२० मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १०३ आहे. सूर्याने टी-२० मध्ये दोन शतके देखील झालकवली आहेत. एकूणच, तो टी-२० मध्ये चार हजार धावा करण्याच्या अगदी ऊंबरठ्यावर आहे.
निकोलस पूरन
निकोलस पूरनची टी-२० कारकीर्द सूर्यकुमार यादवपेक्षा कमी राहिलेली आहे. तो आतापर्यंत एकूण ८५ टी-२० सामने खेळला आहे. यामध्ये त्याने १६८ च्या स्ट्राईक रेटने २,१४६ धावा केल्या आहेत. यामध्ये १३ अर्धशतकांचा समावेश आहे. धावांच्या बाबतीत, पूरन सूर्यकुमार यादवपेक्षा मागे असल्याचे दिसून येत आहे. जरी त्याचे सामने कमी आहेत. परंतु, जर आपण या दोन्ही खेळाडूंमधील फरकाबद्दल बोललो तर ते फारसे नसल्याचेही दिसते.
सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याने ६६ च्या सरासरीने आणि १५६ च्या स्ट्राईक रेटने ३७३ धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान, ६६ हा त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. त्याच वेळी, निकोलस पूरनने ९ सामन्यांमध्ये ४७ च्या सरासरीने आणि २०४ च्या स्ट्राईक रेटने ३७७ धावा केल्या असून आयपीएल २०२५ मध्ये निकोलस पूरन हा सूर्यकुमार यादवच्या पुढे असल्याचे दिसून येते.