फोटो सौजन्य - सोशल मीडिया
महिला T२० विश्वचषक २०२४ : महिला T२० विश्वचषक २०२४ भारतीय संघासाठी फार काही खास ठरला नाही. भारताच्या संघाने पहिला सामना गमावल्यानंतर उपांत्य फेरीचं तिकीटही गमावलं. भारताच्या संघाने विश्वचषमध्ये पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकले, यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या संघाला पराभूत करून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. शेवटच्या साखळी सामन्यामध्ये भारताचा संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाला ९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंग झाले आहे. आता उपांत्य फेरीमध्ये कोणत्या संघानी प्रवेश केला आहे आणि कोणता संघ कोणाशी भिडणार यावर एकदा नजर टाका.
विश्वचषकामध्ये १० संघ सहभागी झाले होते, यामध्ये चार संघानी उपांत्य फेरी गाठली आहे. दोन गट तयार करण्यात आले होते, यामध्ये ग्रुप A मधून ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्व सामने जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर ग्रुप A मधून दुसरा संघ न्यूझीलंडचा संघ आहे, या स्पर्धेमध्ये न्यूझीलंडच्या संघाला ऑस्ट्रेलियाशी पराभवाचा सामना करावा लागला होता. तर गट-ब मध्ये वेगवेगळी गणिते पाहायला मिळतात. या गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंडचे संघ आहेत. या संघांमधून बांगलादेश आणि स्कॉटलंड बाहेर पडले आहेत.
इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात उपांत्य फेरीची लढत सुरू आहे. आज म्हणजेच मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी या गटातील शेवटचा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार असून त्यानंतर उपांत्य फेरीतील दोन्ही संघांचा निर्णय होणार आहे. पहिला उपांत्य सामना गुरुवारी १७ ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल. याशिवाय दुसरा उपांत्य सामना शुक्रवार, १८ ऑक्टोबर रोजी शाहजाह येथील शाहजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर स्पर्धेचा अंतिम सामना २० ऑक्टोबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट, दुबई येथे होणार आहे.