
फोटो सौजन्य - Social Media
KRAFTON इंडियाने 2026 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी (H2) BGMI Esports स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करत BGMI इंटरनॅशनल कप (BMIC) आणि BGMI शोडाउन (BMSD) या दोन प्रमुख स्पर्धांची घोषणा केली आहे. या स्पर्धांद्वारे भारतीय Esports क्षेत्राला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच देशातील सर्वोत्तम संघांना जागतिक दर्जाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
BGMI इंटरनॅशनल कप (BMIC) सीझन 2 ची ग्रँड फायनल 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 दरम्यान मुंबईतील डोम, सरदार वल्लभभाई पटेल (SVP) इंडोअर स्टेडियममध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत भारतातील 6, दक्षिण कोरियातील 5 आणि जपानमधील 5 असे एकूण 16 अव्वल संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, मुंबईत प्रथमच आशियातील सर्वोत्तम BGMI संघ एकाच मंचावर आमनेसामने येणार असून विजेतेपदासाठी ₹1 कोटींच्या बक्षीस राशीसाठी चुरशीची लढत होणार आहे.
याशिवाय, BGMI शोडाउन (BMSD) ही केवळ निमंत्रित संघांसाठी आयोजित करण्यात आलेली विशेष स्पर्धा असणार आहे. BGIS, BMPS आणि KIE लीडरबोर्डमधील कामगिरीच्या आधारे निवडलेल्या भारतातील 48 सर्वोत्तम संघांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा समारोप 16 ते 18 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या LAN ग्रँड फायनल्समध्ये होईल. या स्पर्धेसाठीही ₹1 कोटींची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे.
या घोषणेबाबत बोलताना KRAFTON इंडियाचे असोसिएट डायरेक्टर – Esports करण पाठक म्हणाले की, प्रत्येक नवीन हंगाम हा केवळ मोठा नसून स्पर्धेच्या दर्जाच्या दृष्टीनेही अधिक सक्षम असावा, ही कंपनीची भूमिका आहे. BGMI इंटरनॅशनल कपमुळे आशियातील बलाढ्य संघ मुंबईत येणार आहेत, तर BGMI शोडाउनद्वारे संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघांना सन्मानित करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांना उच्च दर्जाचे सामने पाहायला मिळतील आणि भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावर स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचे व्यासपीठ उपलब्ध होईल.
जरा बचके रहना! Team India सावधान; झिम्बाब्वेने तब्बल ‘इतक्या’ सामन्यात पाजले पाणी, 23 जुलैला…
BMSD स्पर्धा प्रमोशन आणि रेलिगेशन फेऱ्या, सर्व्हायव्हल राऊंड, उपांत्य फेरी, लास्ट चान्स फेरी आणि LAN ग्रँड फायनल्स अशा विविध टप्प्यांत पार पडणार आहे. या स्पर्धात्मक स्वरूपामुळे प्रत्येक संघाला पुढील फेरी गाठण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार असून स्पर्धेची उत्कंठा अधिक वाढणार आहे. KRAFTON इंडियाच्या मते, भारतातील Esports क्षेत्र वेगाने मुख्य प्रवाहात येत आहे. H2 2026 मधील BMIC आणि BMSD सारख्या मोठ्या स्पर्धांमुळे भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांचा अनुभव मिळेल, तसेच चाहत्यांनाही जागतिक स्तरावरील Esports स्पर्धांचा थरार भारतातच अनुभवण्याची संधी मिळणार आहे.