
Kusal Mendis Appointed Sri Lanka Test Captain
८ ऑक्टोबर रोजी बोर्डाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत एसएलसी निवड समितीने मेंडिसला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. धनंजय डी सिल्वाने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मेंडिस कर्णधार म्हणून आपली पहिली कसोटी मालिका पाकिस्तानविरुद्ध खेळेल. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून, पहिला कसोटी सामना ९ नोव्हेंबरला, तर दुसरा कसोटी सामना १७ नोव्हेंबरला सुरू होईल. या मालिकेत कुसल मेंडिसवर सर्वांचे लश्र असेल.कुसल मेंडिस श्रीलंकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने २०१५ मध्ये कसोटी पदार्पण केले. त्यानंतरच्या वर्षी, त्याने श्रीलंकेसाठी एकदिवसीय आणि टी-२० मध्ये पदार्पण केले. तो सध्या श्रीलंकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. नुकतेच, त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १२१ धावांची शानदार खेळी केली.
मेंडिस आता श्रीलंकेचे तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवेल. त्याने आतापर्यंत २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचे नेतृत्व केले असून, त्यापैकी १० सामने जिंकले आहेत. याशिवाय, संघाने १० सामने गमावले असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.मेंडिसने आतापर्यंत ३ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचे कर्णधारपद भूषवले असून, संघाला एक विजय मिळवून दिला आहे तर दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्याने श्रीलंकेसाठी ७५ कसोटी सामन्यांमध्ये ४,८३६ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १५९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,१६० धावा केल्या आहेत आणि १०९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २,६९४ धावा केल्या आहेत.