Lalit Modi Relationship Breakup with beautiful Bollywood actress Now Former IPL chairman Lalit Modi is Dating This Woman Revealed Himself
IPL Chairman Lalit Modi Relationship : IPL चे माजी अध्यक्ष ललित मोदी पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत. त्याने स्वतः त्याच्या नवीन नात्याची पुष्टी केली आहे. व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी, ललित मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की त्यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या मित्रासोबतचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने त्याच्या जोडीदारांचे फोटो शेअर केले आहेत पण त्यांची नावे गुप्त ठेवली आहेत.
२५ वर्षांची मैत्री प्रेमात बदलली
ललित मोदींचे चाहते या नवीन सुरुवातीबद्दल त्यांचे अभिनंदन करीत आहेत. आनंद व्यक्त करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी एकदा भाग्यवान होतो, पण दुसऱ्यांदाही भाग्यवान आहे. आता २५ वर्षांची मैत्री प्रेमात बदलली आहे. हे दोनदा घडले आहे. मला आशा आहे की तुमच्याही बाबतीत असाच योगायोग असेल.”
१९९१ मध्ये मीनल संगराणीशी लग्न
ललित मोदी यांनी १९९१ मध्ये मीनल संगराणीशी लग्न केले आणि त्यांचे नाते २७ वर्षे टिकले. मीनल यांचे २०१८ मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. त्याला आलिया आणि रुचिर अशी दोन मुले आहेत. ललितला एक सावत्र मुलगी देखील आहे, जी मीनलच्या पहिल्या लग्नापासून जन्मली होती. ललित आणि मीनल यांच्या वयात सुमारे १० वर्षांचा फरक असल्याने त्यांच्या नात्यात समस्या निर्माण झाल्या. ललितचे कुटुंबही या लग्नाच्या बाजूने नव्हते, परंतु त्यांचे नाते दृढ राहिले.
सुश्मिता सेनला करीत होता डेट
ललितच्या क्रिकेट प्रशासन कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, आर्थिक व्यवहारातील अनियमिततेमुळे २०१० मध्ये बीसीसीआयने त्याला निलंबित केले होते. या आरोपांमध्ये दोषी आढळल्यानंतर २०१३ मध्ये ललितवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. काही काळापूर्वी, तो भारतीय अभिनेत्री सुष्मिता सेनला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या, परंतु दोघांपैकी कोणीही या नात्याला दुजोरा दिला नाही.