फोटो सौजन्य - Gujarat Titans
Lucknow Super Giants vs Gujarat Titans : आयपीएल २०२५ चा हा हंगाम फारच मनोरंजक होत चालला आहे. आयपीएल २०२५ चा २६ वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात शनिवार, १२ एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये आहेत. शेवटच्या सामन्यात एलएसजीने कोलकाता नाईट राइडर्सला हरवले, तर गुजरातने राजस्थानला हरवले. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स गुजरातविरुद्ध विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. अशा परिस्थितीत, गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सचाचा प्लेइंग इलेव्हन संघ खालीलप्रमाणे असू शकतो.
लखनौ विरुद्ध जीटी सामन्यात एडन मार्कराम आणि मिशेल मार्श यांना सलामीची जोडी म्हणून पाहिले जाऊ शकते. गेल्या सामन्यात मार्करामने शानदार कामगिरी केली होती. त्याने २८ चेंडूत ४७ धावा केल्या, तर मार्श जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने ४८ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये मार्श उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे.
Vibing together since 2022 💙😍 pic.twitter.com/2tzndEjKx5
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 11, 2025
फॉर्ममध्ये असलेला निकोलस पूरन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी घेऊ शकतो. सध्या तो आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑरेंज कॅप धारण करतो. ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तथापि, कर्णधार पंतची बॅट अद्याप फॉर्ममध्ये आलेली नाही. तो ५ सामन्यांपैकी ४ डावात अपयशी ठरला आहे. खालच्या मधल्या फळीत अब्दुल समद, डेव्हिड मिलर आणि आयुष बदोनी हे जबाबदारी सांभाळू शकतात.
रवी बिश्नोई, दिग्वेश राठी फिरकी गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, तर आकाशदीप, शार्दुल ठाकूर आणि आवेश खान हे वेगवान गोलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता आहे. केकेआर विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात आकाशदीप आणि शार्दुलने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.
LSG vs GT : गुजरातविरुद्ध लखनऊच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होणार? या खेळाडूंना मिळू शकते संधी!
गुजरात टायटन्सच्या संघाने या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर गुजरातच्या संघाने एकही सामना गमावलेला नाही. गुजरात टायटन्सचा संघ हा स्पर्धेमध्ये गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सचा या सीझनमध्ये कर्णधार बदलला आहे, रिषभ पंतच्या नेतृत्वात लखनौच्या संघाने या स्पर्धेमध्ये चढउताराचा प्रवास राहिला आहे. लखनौ सुपर जायंट्सचे ५ सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर ३ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी,
(इम्पॅक्ट रवी बिश्नेई).