LSG vs PBKS: Digvesh Rathi won't give up! He did the 'notebook celebration' once again after dismissing Iyer, watch the video
LSG vs PBKS : आयपीएल २०२५ च्या ५४ व्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा दणदणीत परभव केला. या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब संघाने प्रभसिमरन सिंगच्या ४८ चेंडूत ९१ धावांच्या जोरावर लखनौसमोर २३६ धावांचा भला मोठा डोंगर उभा केला होता. याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यरने देखील २५ चेंडूत ४५ धावांची महत्वाची खेळी साकारली. प्रत्युउत्तरात एलएसजीचा संघ केवळ १९९ धावापर्यंतच पोहचू शकला. तथापि, पंजाबच्या विजयापेक्षाही चर्चा झाली ती म्हणजे दिग्वेश राठीच्या सेलिब्रेशनची. ज्याने पुन्हा एकदा त्याच्या नोटबुक सेलिब्रेशनने खळबळ उडवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मशाळेच्या मैदानावर पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केल्यानंतर दिग्वेश राठीने पुन्हा एकदा नोटबुक वादग्रस्त सेलिब्रेशन केले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यावर आता अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा : LSG vs PBKS : ‘त्याच्यात MS Dhoni चे गुण, तोही तसाच..’, IPL मध्ये Matthew Hayden कडून नव्या धोनीचा शोध..
आयपीएलच्या १८ व्या हंगामात दिग्वेश राठीचे सेलिब्रेशन सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. सगळेच याबद्दल बोलताना दिसत आहेत. कारण बीसीसीआयला हे सेलिब्रेशन अजिबात आवडले नाही. तो जेव्हा जेव्हा असे करतो तेव्हा तेव्हा बीसीसीआयने त्याला दंड ठोठावला आहे. या कारणास्तव, त्याने आपला हात वही म्हणून वापरणे थांबवले आणि मैदानावरच सही करायला सुरुवात केली आहे. पण, पंजाबविरुद्ध त्याचा जुना फॉर्म पुन्हा एकदा दिसला.
Power meets Payback 👊
🎥 Shreyas Iyer dazzled with a standstill six, only to be undone by Digvesh Rathi’s delivery right after!
Updates ▶ https://t.co/YuAePC273s#TATAIPL | #PBKSvLSG pic.twitter.com/oxPiUi1vRm
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
आता बीसीसीआय पुन्हा एकदा दिग्वेशवर अशीच कारवाई करणार की काय? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. लखनौ आणि पंजाब यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात पहिल्यांदाच विकेट घेतल्यानंतर दिग्वेशने सलामीवीर प्रियांश आर्यला बाद केल्यानंतर एक अनोखे सेलिब्रेशन केले होते.
पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना प्रभसिमरन सिंगच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर २३६ धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. कर्णधार श्रेयस अय्यरने ४५ धावा, शशांक सिंगने ३३ धावा आणि यष्टिरक्षक जोश इंग्लिशने ३० धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. लखनौकडून आकाश सिंग आणि दिग्वेश यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. प्रत्युत्तरादाखल, लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात वाईट खराब झाली. तथापि, आयुष बदोनीने ७४ धावांची झुंजार खेळी केली परंतु शेवटच्या षटकांमध्ये अब्दुल समदने २४ चेंडूत ४५ धावा करून संघाला २०० च्या जवळ पोहचवले. मात्र, तो संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला.