फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामन्याची कसोटी मालिका पार पडली. यामध्ये भारताचे संघाने दोन सामने जिंकले तर इंग्लंडने देखील दोन सामन्यात विजय मिळवला. तर एक सामने या मालिकेतील ड्रॉ झाला त्यामुळे मालिकादेखील ड्रॉ घोषित करण्यात आली. भारताच्या संघासाठी या मालिकेमध्ये अनेक अडचणी पाहायला मिळाल्या टीम इंडियाच्या संघामधील अनेक खेळाडू हे जखमी झाले होते यामध्ये ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, आकाशदीप, अर्षदीप सिंग यांसारख्या खेळाडूंना मालिकेदरम्यान दुखापत झाली होती.
या मालिकेमध्ये अनेक खेळाडूंना रिप्लेस करण्यात आले होते. ऋषभ पंत याला चौथ्या आणि पाचव्या सामन्यात गंभीर दुखापत झाला होता चौथ्या सामन्यांमध्ये त्याच्या हाताला लागले होते त्यामुळे त्याला चालू सामना सोडावा लागला होता त्यानंतर ध्रुव जुरेल याने कीपिंग केली होती. सर पाचव्या सामन्यांमधून त्याला बाहेर व्हावे लागले होते त्यामुळे ध्रुव जुरेल याला संघामध्ये स्थान मिळाले होते.
Dhruv Jurel — Team India’s Lucky Charm? 🍀
India has won all five Tests he’s featured in so far! 💪🇮🇳#ENGvIND #DhruvJurel #Tests #Sportskeeda pic.twitter.com/XJgYhZNYAe
— Sportskeeda (@Sportskeeda) August 6, 2025
भारताच्या संघाने इंग्लंड दौऱ्यावर मालिका ड्रॉ केली असली तरी भारताचा त्यांच्या होम ग्राउंडवर म्हणजे भारतामध्ये झालेल्या मालिकेंमध्ये फार चांगला रेकॉर्ड आहे. भारताच्या संघामध्ये जर ध्रुव जुरेल असेल तर संघाने आतापर्यंत एकही सामना पराभूत झालेला नाही असे रेकॉर्ड्स आता समोर आले आहेत. त्याने आतापर्यत त्याच्या कारकिर्दिमध्ये कमालीचे आकडे आहेत. 2024 मध्ये ध्रुव जुरेल याला भारतीय संघामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
जुरेल याने भारतीय संघासाठी भारतामध्ये आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. या पाचही सामन्यात त्याने विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये राजकोट येथे झालेल्या सामन्यात भारताच्या संघाने 434 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यांमध्ये रांची येथे भारताच्या संघाला पाच विकेट्स ने विजय मिळाला होता.
अफगाणी खानने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! केला भीम पराक्रम; ठरला जगातील पहिलाच खेळाडू..
धर्मशाळा येथे झालेल्या सामन्यांमध्ये ज्या संघांमध्ये ध्रुव जुरेल होता या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने 64 धावांनी विजय मिळवला होता. पर्थ येथे झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने 295 धावांनी विजय नावावर केला होता तर 2025 मध्ये झालेल्या वल येथील सामन्यात भारताचे संघाने सहा धावांनी विजय मिळवला.