रशीद खान(फोटो-सोशल मीडिया)
Afghani Khan creates history in T20 cricket : अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज रशीद खानने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करताना दिसून येत आहे. मंगळवारी रशीद खानने टी-२० क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये ६५० विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
द हंड्रेड २०२५ मध्ये ओव्हल इनव्हिन्सिबल्सकडून खेळताना रशीद खानने त्याच्या पहिल्याच सामन्यात ही किमया केली आहे. रशीद खानने लॉर्ड्स येथे लंडन स्पिरिटविरुद्ध ३ बळी टिपले आहेत. या काळात त्याने २० चेंडूत फक्त ११ धावा देऊन ३ मोठ्या विकेट्स मिळवल्या. यासह, रशीद टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. रशीद खानने यापूर्वी वेन मॅडसेन, रायन हिगिन्स आणि लियाम डॉसन यांचे विकेट्स घेतल्या होत्या.
रशीद खानने या वर्षाच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिका टी-२० दरम्यान वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला मागे टाकले होते. तो त्यावेळीच टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. आता त्याने त्याचा विक्रम आणखी पुढे नेत टी-२० क्रिकेटमध्ये ६५० विकेट घेण्याचा विक्रम रचला आहे.
द हंड्रेड लीग २०२५ मध्ये त्याच्या शानदार कामगिरीसाठी रशीद खानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सामन्यानंतरच्या सादरीकरणात रशीद खानने प्रतिक्रिया दिली की, विजयाने सुरुवात झाली ही चांगली गोष्ट आहे. संघाने चांगली कामगिरी केली आणि संपूर्ण संघाने देखील चमकदार खेळ दाखवला.
हेही वाचा : शुभमन गिलला सोन्याचे दिवस! ICC Player of the Month साठी नामांकन; ‘या’ खेळाडूंशी करावे लागतील दोन हात..