Chinnaswamy Stadium Stampede: Major action in Bengaluru stampede case; Four people including Virat Kohli's close aide arrested
Chinnaswamy Stadium Stampede : आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरी ११ जणांचा हकनाक बळी गेला तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणी आता कर्नाटक सरकारने प्रथमच मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आयुक्तांसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. आता पोलिसही देखील सक्रिय झाले आहेत. पोलिसानी आता या प्रकरणी आरसीबीच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांसह ४ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. यातील एक जण हा विराट कोहलीच्या जवळचा असल्याचे बोलले जात आहे.
४ जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणात कर्नाटक पोलिसांकडून आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्सच्या ३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेच्या वेळी निखिल सोसाळे बेंगळुरूहून मुंबई विमानतळावर जात होता अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा : IPL 2025 : कसा राहिला 18 वा हंगाम? RCB च्या पहिल्या विजेतेपदासह जाणून घ्या ‘या’ संघांचा प्रवास..
यापूर्वी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून यांनी गुरुवारी बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद आणि अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर, वरिष्ठ आयपीएस अधिकारी सीमांत कुमार सिंग यांची पुढील आदेशापर्यंत बेंगळुरूचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आरसीबी संघ, इव्हेंट मॅनेजमेंट फर्म डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिनिधींना अटक करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध आरोपांखाली एफआयआर दाखल केला गेला आहे.
चेंगराचेंगरीप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी अटक करण्यात आलेला निखिल सोसाळे हा आरसीबीचा मार्केटिंग प्रमुख असून तो संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा जवळचा असल्याचे मानले जात आहे. सोसाळे २०२५ च्या हंगामात तो आरसीबीच्या प्रत्येक आयपीएल सामन्यात दिसून आला होता. अनेक प्रसंगी तो विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासोबत स्टँडमध्ये देखील बसलेला दिसला आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : इंग्लंड दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर, भारतीय संघाला आता मिळाला नवीन कोच; काय असेल भूमिका?
आरसीबी संघ आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकल्यानंतर, संघ मालकांकडून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सरकारचा देखील सहभाग होता. खेळाडूंना पाहण्यासाठी आणि उत्सवात सामील होण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. जी हाताळणे पोलिसांच्या क्षेमतेबाहेर गेले. स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्नात चेंगराचेंगरीची घटना घडून ११ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाल्यानंतर देखील आतमध्ये उत्सव सुरूच राहिला, असा आरोप करण्यात आला आहे.