शुभमन गिल(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs ENG : इंडियन प्रीमियर लीग २०२५ संपली असून या वर्षी आरसीबीने पंजाबला हरवून पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आता भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड ला रवाना होणार आहे. यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर बीसीसीआयने टीम इंडियासाथी नवीन कर्णधार शुभमन गिलची निवड केली.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक तरुण खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, संघ पहिल्यांदाच तरुण अनुभवासह परदेशात खेळणार आहे. याआधी, संघाला एक नवीन स्ट्रेंथ कोच देखील मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : Chinnaswamy Stadium Stampede: ‘आरसीबी’ आणि ‘डीएनए’ कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ; चेंगराचेंगरी प्रकरणात थेट…
दक्षिण आफ्रिकेचे लोकप्रिय क्रीडा शास्त्रज्ञ एड्रियन ले रॉक्स हे भारतीय पुरुष संघाचे नवीन स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच असणार आहेत. आता ते माजी स्ट्रेंथ कोच सोहम देसाई यांची जागा घेणार आहेत. देसाई अलीकडेच या पदावरून पायउतार झाले आहेत. रॉक्सबद्दल सांगायच झाल तर त्याने यापूर्वी देखील भारतीय संघासोबत काम केले आहे. इंग्लंड मालिकेपूर्वी टे भारतीय संघात सामील होणार आहेत.
ले रॉक्सने २००२ ते २००३ पर्यंत भारतीय संघासोबत होते. याशिवाय, त्यांनी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जसोबत देखील काम पाहिले आहे. अशा परिस्थितीत, आता रॉक्स पुन्हा टीम इंडियासोबत काम करण्यास सज्ज आहेत.
या वर्षी पंजाब किंग्जने आयपीएल २०२५ मध्ये उत्तम कामगिरी केली आहे. संघ चालू हंगामाच्या अंतिम फेरीत पोहचला होता. जिथे पंजाबला जेतेपदाच्या सामन्यात आरसीबीने फक्त ६ धावांनी पराभूत केले. एड्रियन ले रॉक्स गेल्या सहा वर्षांपासून पंजाब किंग्जच्या सेवेत आहेत.
हेही वाचा : IPL 2025 : कसा राहिला 18 वा हंगाम? RCB च्या पहिल्या विजेतेपदासह जाणून घ्या ‘या’ संघांचा प्रवास..
ले रॉक्सने फ्रँचायझीला निरोप देताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक भावुक संदेश शेअर केला आहे. ते म्हणाले की, माझा सहा वर्षांचा प्रवास खूप छान राहिला आहे. आम्ही (पंजाब किंग्ज) अंतिम फेरीत पोहोचलो, आम्ही थोडे कमी पडलो, पण मला आमच्या संघाच्या कठोर परिश्रमाचा अभिमान आहे. सर्व खेळाडू, कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे मनापासून आभार. क्रिकेट हे फक्त निकालाबद्दल नाही तर तुमच्यासोबत कायमचे राहणाऱ्या नातेसंबंधांबद्दल आणि आठवणींबद्दल देखील आहे. असे ले रॉक्स यांनी लिहिले होते.