Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khelo India Para Games : मराठमोळे ऑलिम्पिकपटू गाजविणार दिल्लीेचे मैदान; खेलो इंडिया पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्र सज्ज.. 

राजधानी दिल्लीत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा स्पर्धेचा बिगुल गुरूवार 20 मार्च रोजी वाजणार आहे. या स्पर्धेसाठी मराठमोळे पॅरीस पॅरा ऑलिम्पिकपटू सज्ज झाले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 19, 2025 | 09:30 PM
Khelo India Para Games: Marathi Olympians will grace the Delhi stadium; Maharashtra is ready for the Khelo India Para Games..

Khelo India Para Games: Marathi Olympians will grace the Delhi stadium; Maharashtra is ready for the Khelo India Para Games..

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : सलग दुसर्‍यांदा राजधानी दिल्लीत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा स्पर्धेचा बिगुल गुरूवार 20 मार्च रोजी वाजणार असून महाराष्ट्र स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. मराठमोळे पॅरीस पॅरा ऑलिम्पिकपटू सुकांत कदम, संदिप सलगर, स्वरूप उन्हाळकर, दिलीप गावीत भाग्यश्री जाधव हे दिल्लीतील स्पर्धेत सुवर्ण पदकांचे दावेदार आहेत.

दुसरी खेलो इंडिया पॅरा स्पर्धा 20 ते 27 मार्च दरम्यान दिल्लीत 3 क्रीडा संकुलात रंगणार आहे. आर्चरी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी व टेबलटेनिस या 6 क्रीडाप्रकारात देशभरातील 1300 क्रीडापटू सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम व डॉ. कर्णी सिंग शूटींग रेंज सज्ज झाली आहे.

स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे 78 क्रीडापटू पात्र ठरले आहेत. सर्वाधिक 36 खेळाडू अ‍ॅथलेटिक्समध्ये पदकांसाठी झुंजणार आहेत. खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकारी असे एकूण 120 जणांचे पथक असणार आहे. गत दिल्लीतील पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्राने 12 सुवर्ण, 7 रौप्य, 16 कांस्यपदकांसह 35 पदकांची कमाई केली होती. गत स्पर्धेत महाराष्ट्राला पाचवे स्थान प्राप्त झाले होते. यंदा महाराष्ट्राचे खेळाडू चमकदार कामगिरी करून क्रमवारीत मुसंडी मारतील असा विश्वास पथकप्रमुख मिलिंद दिक्षीत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचा बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स व नेमबाजीचा संघ पुण्यातून रवाना झाला आहे. या संघाला क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : IPL 2025 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात ईडन गार्डनवर घुमणार ‘हा’ आवाज; ‘हे’ बॉलीवूड स्टार्स लावणार चार चांद..

बॅडमिंटन स्पर्धेला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. महाराष्ट्राच्या विजयाची मोहिम बॅडमिंटन कोर्टपासून सुरू होणार आहे. सांगलीचा सुकांत कदम एस एल 4 गटात सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार आहेत. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असणार्‍या सुकांतने पॅरीस ऑलिम्पिकमध्येही चमकदार कामगिरी केली होती. प्रथमच तो खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत खेळणार आहे. बॅडमिंटनमध्ये निलेश गायकवाड, मार्क धरमाई, प्रेम अले, आरती पाटील या महाराष्ट्राचे खेळाडूंही विजयासाठी मैदानात खेळताना दिसतील.

शुक्रवार 21 मार्चपासून अ‍ॅथलेटिक्सचा थरार रंगणार आहे. संदिप सलगर, भाग्यश्री जाधव, दिलीप गावीत या पॅरीस ऑलिम्पिकपटूं अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजविताना दिसतील. हातावर शस्त्रक्रिया झाल्याने भालाफेकपटू संदिप सलगरला पहिल्या स्पर्धेपासून वंचित रहावे लागले होते. संदिप प्रथमच खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत खेळणार असून तो सुवर्णपदकासाठी फेकी करताना दिसेल. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या संदिपची 67 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी असल्याने संभाव्य विजेता म्हणून त्याचाच दिल्लीत डंका आहे.

हेही वाचा : ‘सिग्नल जीत का’ मोहिमेसोबत टेक्नोची आयपीएल 2025 मध्ये दमदार एंट्री; KKR सोबत केला खास टाय-अप..; वाचा सविस्तर..

गत स्पर्धेत भालाफेक व गोळाफेकीत दोन सुवर्णपदके जिंकणारी भाग्यश्री जाधव स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू ठरणार आहे. सलग दुसर्‍यांदा दुहेरी सुवर्णपदकासाठी ती सज्ज झाली आहे. 400 मीटर शर्यत गाजविणारा दिलीप गावीत सलग दुसर्‍यांदा पदकासाठी उत्सुक आहे. नेमबाजीत कोल्हापूरचा ऑलिम्पिकपटू स्वरूप उन्हाळकर तर आर्चरीत मुंबईचा आशियाई पदकविजेता आदिल अन्सारी हे सलग दुसर्‍यांदा सुवर्ण पदकाचा वेध घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Web Title: Marathi olympians ready for khelo india para games in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 09:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.