'सिग्नल जीत का' मोहिमेसोबत टेक्नोची आयपीएल 2025 मध्ये दमदार एंट्री; KKR सोबत केला खास टाय-अप..; वाचा सविस्तर..(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. या हंगामातील पहिला सामना हा गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळवला जाणारा आहे. अशातच आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तंत्रज्ञान आणि क्रिकेटचा उत्तम संगम आता आयपीएलमध्येही अनुभवायला मिळणार आहे. नाविन्यपूर्ण टेक ब्रँड टेक्नोने गतविजेत्या आयपीएल विजेत्या संघ कोलकाता नाइट रायडर्स सोबत टायअप केले आहे. क्रिकेट आणि तरुणांची आवड आणखी वाढवण्यासाठी करण्यात आलेला हा टाय-अप खेळाचा उत्साह आणि तंत्रज्ञान वाढवणार आहे.
भारतात क्रिकेट प्रेम सर्वश्रुत आहे. क्रिकेट हा भारतीय जीवनाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. अशातच आता टेक्नो त्याच्या शक्तिशाली आणि स्टायलिश स्मार्टफोन्सद्वारे चाहत्यांना गेमशी जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता ‘सिग्नल जीत का’ मोहिमेसह, टेक्नो हे सुनिश्चित करणार आहे की, प्रत्येक चौका, प्रत्येक विकेट आणि सुपर ओव्हर कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्रेक्षकांच्या फोनवर सहज पोहोचेल.
हेही वाचा : IPL 2025 : IPL इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकणारे ‘हे’ फलंदाज माहिती आहेत का? जाणून घ्या..
टेक्नो मोबाइल इंडियाचे सीईओ अरिजित तलपात्रा म्हणाले की, ‘कोलकाता नाइट रायडर्ससोबत करार करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. क्रिकेट हा फक्त एक खेळ नसून ती लाखो हृदयांना जोडणारी एक भावना आहे. हे भारतातील तरुणांना सक्षम बनवण्याच्या आमच्या ध्येयाशी पूर्णपणे जुळणारे आहे. ‘सिग्नल जीत का’ उपक्रमाद्वारे, चाहते नेहमी एकमेकांशी जोडले जाणार आहेत आणि रोमांचक सामन्याचा एकही क्षण चुकवू नये हे सुनिश्चित करण्याचे आमचे ध्येय आहे. केकेआर ज्याप्रमाणे मैदानावर पूर्ण समर्पणाने खेळत असते त्याचप्रमाणे आम्हीही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम तंत्रज्ञान देण्यासाठी वचनबद्ध असणार आहोत. जेणेकरून ते आमच्याशी आणि खेळाच्या प्रत्येक क्षणाशी जोडलेले राहतील.’
केकेआरचे घोषवाक्य ‘कर्बो लार्बो जीतबो’ हे टेक्नोच्या स्टॉप ॲट नथिंग तत्वज्ञानासारखेच आहे. जे कठोर परिश्रम, टीम वर्क आणि क्रिकेटप्रती समर्पण दर्शवते. हे टाय अप तंत्रज्ञान आणि खेळांबद्दल विशेष आवड असलेल्या भारतातील तरुणांसोबत जोडण्यासाठी टेक्नोची वचनबद्धता दर्शवते. त्याच्या एकूणच प्रगत उत्पादनांसह आणि उत्कृष्ट सिग्नल कनेक्टिव्हिटीसह, टेक्नो हे सिद्ध करून दाखवते की ते कार्यप्रदर्शन, उत्कृष्टता आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीला सर्वोच्च प्राधान्य देते.
हेही वाचा : IPL 2025 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात ईडन गार्डनवर घुमणार ‘हा’ आवाज; ‘हे’ बॉलीवूड स्टार्स लावणार चार चांद..
नाइट रायडर्स स्पोर्ट्सच्या सीएमओ बिंदा डे यांनी म्हटले आहे की, भारतातील क्रिकेटच्या विकासात तंत्रज्ञानाचे योगदान खूप महत्त्वाचे राहिले आहे. टेक्नोसोबतची आमची भागीदारी या दिशेने एक उत्तम संधी असल्याचे आम्ही मानतो आहे. नाइट रायडर्स म्हणून, आमच्या चाहत्यांना खेळाच्या अधिक जवळ आणण्याचा आणि त्यांना उत्तम अनुभव देण्यासाथी आम्ही नेहमीच प्रयत्न राहिलो आहे. या भागीदारीतूनही आमचे उद्दिष्ट तेच राहीले.