फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी : नोव्हेंबर महिन्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी बीसीसीआयने संघाची निवड करण्याचे काम सुरु केले आहे. यामध्ये कोणत्या खेळाडूंना घ्यायचे हे आतापासूनच ठरवले जाणार नाही परंतु नक्कीच खेळाडूंच्या कामगिरीवर नजर ठेवली जाईल. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे स्थान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जवळजवळ पक्के झाले आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहचा पार्टनर कोण असणार आहेत, यासाठी क्रिकेट संघाकडे त्याचबरोबर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कडे बरेच पर्याय आहेत. यामध्ये मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर असे बरेच खेळाडू आहेत त्यांना संघामध्ये स्थान मिळू शकते.
भारतीय वेगवान गोलंदाज मयंक यादवने IPL २०२४ मध्ये ताशी १५० किलोमीटर वेगाने चेंडू टाकण्याच्या क्षमतेने जागतिक क्रिकेटमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली. यानंतर भारतीय माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी बीसीसीआयला आयपीएलनंतर या गोलंदाजाचा भारतीय संघात समावेश करण्याची विनंती केली. यावर आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी उत्तर दिले आहे.
हेदेखील वाचा – विनेश फोगाट भारतात परतल्यानंतर पतीने केले मोठे वक्तव्य! म्हणाला आता आम्ही कुस्ती खेळू…
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना जय शाह यांना विचारण्यात आले की, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराहचा पार्टनर कोण असणार आहे? यावर जय शाह म्हणाले की, मयंक यादवबद्दल मी तुम्हाला कोणतेही उत्तर देऊ शकत नाही, कारण तो संघात असेल की नाही याची शाश्वती नाही, परंतु तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे आणि आम्ही त्याची काळजी घेत आहोत. तो सध्या एनसीएमध्ये आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे आयोजन २२ नोव्हेंबर पासून करण्यात आले आहे. त्यासाठी आयसीसीचे जोरदार तयारी सुरु झाली आहे. यामध्ये पहिला सामना २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या काळामध्ये होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना ६ डिसेंबर ते १० डिसेंबर या दिनी आयोजन करण्यात आले आहे.