फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विनेश फोगाटच्या पतीचे वक्तव्य : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट मोठ्या अडचणीत पाहायला मिळाली. तिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये गोल्ड मेडल सामान्यांमधून डिसक्वालिफाय करण्यात आले होते. त्यानंतर हा मुद्दा भारतातच नाही तर जगभरामध्ये गाजला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये झालेल्या वादानंतर १७ ऑगस्ट रोजी विनेश फोगाट भारतामध्ये मायदेशी परतली. यावेळी तिचे दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळी विनेश फोगाट तिच्या आईला पाहून भावुक होताना दिसली. त्याचबरोबर तिची खास मैत्रीण साक्षी मलिकला मिठी मारून रडताना दिसली. विनेशने भारतात आल्यानंतर तिला पाठिंबा देणाऱ्यांचेही आभार मानले. मात्र, यावेळी विनेशही भावूक झाली. आता विनेशच्या पतीने तिच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना विनेश फोगटचे पती सोमवीर राठी म्हणाले की, “दीड ते दोन वर्षांपासून काय चालले आहे ते तुम्ही पाहत आला आहात. आमच्यासोबत कोणताही फेडरेशन नाही आहे, आमच्यासोबत कोणीही नाही. आम्ही सर्व काही पाहिले आहे. आम्ही यापुढे कुस्ती खेळू शकणार नाही. आम्ही आतून तुटलो आहोत. आता खेळ कोणासाठी खेळणार? आम्ही खूप विचारपूर्वक कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. आमचा प्रवास इथपर्यंत होता. आता आम्ही पुढे खेळू शकणार नाही. पुढे काहीही करू शकणार नाही, आम्ही पदक मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला खूप वाईट वाटतं, आम्ही ते देशासाठी करू शकलो.
हेदेखील वाचा – पडद्यामागे मैत्री, दिखाव्यासाठी राजकीय नेत्यांचे शत्रुत्व! कंगना रनौतने केला खुलासा
विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी कुस्ती स्पर्धामध्ये झुंज दिली. तिच्या पहिल्याच सामन्यात विनेशने सुवर्णपदक विजेती आणि गेल्या ऑलिम्पिकमधील विश्वविजेत्या कुस्तीपटूचा पराभव केला. त्यानंतर तिने क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये टॉप १० मध्ये असलेल्या दमदार खेळाडूंना पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. यानंतर विनेशने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत दमदार विजयाची नोंद केली. मात्र, अंतिम सामन्याच्या दिवशी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले.