
Messi India Tour Live: 'Brought shame to the country...' Messi's fans create a ruckus in the stadium! Bottles and chairs were thrown; Watch VIDEO.
Messi India Tour Iive : अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला असून भारतीय फुटबॉल चाहते मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत. मेस्सी तीन दिवसांसाठी भारत दौऱ्यावर असून त्याच्या दौऱ्याला ‘GOAT इंडिया टूर’ असे नाव दिले गेले आहे. दरम्यान कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियममध्ये “मेस्सी मॅजिक” पाहण्यासाठी गर्दीम केलेल्या चाहत्यांना खूप वाईट वाटले आणि त्यातून हिंसक वळण देखील लागल्याचे दिसून आले. नेमकं काय घडले त्याबद्दल आपण पाहूया.
लिओनेल मेस्सीला जवळून पाहण्याचे स्वप्न घेऊन स्टेडियममध्ये आलेल्या चाहत्यांना त्याला थोड्या वेळासाठीच पाहता आले, ज्यामुळे चाहते नाराज झाले आणि त्यांना रंग देखील आल. मेस्सी पाच मिनिटांसाठी स्टेडियममध्ये घुसला आणि नंतर निघून देखील गेला, ज्यामुळे साल्ट लेक स्टेडियममधील चाहत्यांमध्ये नाराजी आणि रोष निर्माण झाला. त्यातून हिंसकतेला चालना मिळून चाहत्यांनी स्टेडियमवर बाटल्या, बेल्ट आणि खुर्च्या फेकल्या. तसेच आपला राग व्यक्त करण्यासाठी बिलबोर्ड फोडताना देखील काही चाहते दिसून आले. याचा आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Pathetic. Woeful. Poignant. Poor Organised event in Kolkata. Management played with fans emotion.#Messi #MessiInIndia #Messi𓃵 #MessiKolkata pic.twitter.com/efrSb7Nwxu — Jaikumar Murugesan (@ChoChoJaikul) December 13, 2025
हेही वाचा : मनाचा राजा ‘मियाने भाई’ने आणखी एकदा चाहत्यांची जिंकली मनं! POTM जिंकल्यानंतर कोणाला दिले बक्षीस?
मेस्सी सकाळी ११:१५ वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचला पण स्टेडियम तो लवकर बाहेर निघून गेला. एका चाहत्याने मेस्सीने स्टेडियमचा पूर्ण फेरा पूर्ण न केल्यामुळे या घटनेला लज्जास्पद असे म्हटले आहे. आता याबाबत चाहत्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत.
यापूर्वी, मेस्सीने शाहरुख खान आणि संजीव गोयंका यांच्यासह अनेक लोकांशी भेटी घेतल्या. २०२२ चा फिफा विश्वचषक जिंकणारा मेस्सी कोलकात्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून तीन दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यासाठी शनिवारी संध्याकाळी हैदराबादला रवाना होणार आहे. या कार्यक्रमाला कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महान भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली आणि सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान देखील हजर राहणार आहेत.