फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Mohammed Siraj Marathi news : भारताचा संघ सध्या टी20 मालिका खेळत आहे, या मालिकेमध्ये भारताच्या संघामध्ये हर्षित राणा याला संघामध्ये स्थान मिळाल्यामुळे मोहम्मद सिराज याला भारतीय संघामधून मागील अनेक महिन्यापासून वगळले जात आहे. सध्या तरी तो फक्त टेस्ट क्रिकेट खेळताना दिसत आहे. भारताच्या संघामध्ये त्याला न मिळाल्यामुळे तो सध्या देशातंर्गत सामने खेळताना दिसत आहे. भारतीय टी-२० संघात स्थान मिळवू न शकलेला मोहम्मद सिराज सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत आहे.
१२ डिसेंबर रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराज हैदराबादकडून खेळला. या सामन्यात तीन विकेट्स घेऊन त्याने हैदराबादच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात सिराजने ३.५ षटके टाकली, ज्यामध्ये त्याने फक्त १७ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. या शानदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेल्या मोहम्मद सिराजने असे काही केले की सर्वजण त्याला सलाम करत आहेत.
मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादने मुंबईला १३१ धावांवर रोखले. या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादने ११.५ षटकांत नऊ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. तन्मय अग्रवाल हा हैदराबादचा हिरो ठरला, त्याने केवळ ४० चेंडूत ७५ धावा केल्या, ज्यामध्ये सात चौकार आणि चार उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
Mohammed Siraj won the POTM award vs Mumbai in SMAT 2025. 🥇#MohammedSiraj #BCCI #SMAT2025 pic.twitter.com/6A0KfMmMog — 𝐈𝐂𝐓 ᴬᵁᴿᴬ🇮🇳 (@AURAICTT) December 12, 2025
मोहम्मद सिराजने सामन्याचा रंगतदारपणा दाखवला आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तन्मयने ७५ धावा करूनही तो रिकाम्या हाताने मैदानात उतरला.पण यावेळी मोहम्मद सिराजने खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आणि एक वरिष्ठ खेळाडू म्हणून त्याने संघातील सहकारी तन्मय अग्रवालसोबत सामनावीराचा पुरस्कार सामायिक केला. सिराजच्या या कृतीने तन्मयला नक्कीच खूप प्रोत्साहन मिळाले असेल.
मोहम्मद सिराजने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता, परंतु तो एकदिवसीय आणि टी-२० संघातून वगळला गेला आहे. या विश्रांतीच्या काळातही तो क्रिकेटपासून दूर राहत नाही आणि तो देशांतर्गत क्रिकेट खेळत राहतो.






