फोटो सौजन्य - gujarat_titans सोशल मीडिया
Mumbai Indians and Gujarat Titans Playing 11 : आयपीएल २०२५ चा आज ९ वा सामना खेळवला जाणार आहे, या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये रंगणार आहे. आजचा दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. सीझनमधील दोन्ही संघानी त्यांचा पहिला सामना गमावल्यानंतर, एमआय आणि जीटी येथे दोन महत्त्वाचे गुण मिळविण्याचा प्रयत्न करतील. मुंबईसाठी सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्याचे संघामध्ये पुनरागमन होणार आहेत. एका सामन्याची बंदी संपल्यानंतर आता पंड्या संघाचे नेतृत्व करार आहे पहिल्या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले पण त्यांना पहिल्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
तर गुजरात टायटन्सच्या संघाला पहिल्या सामन्यांमध्ये पंजाब किंग्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आहे आणि तो गुजरातचे नेतृत्व करताना येथे निर्माण केलेल्या अहमदाबाद स्टेडियममधील त्याच्या काही जुन्या आठवणींनाही ताजेतवाने करू इच्छितो. तथापि, मुंबईचा बुमराह अजूनही उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांच्या गोलंदाजांना थोडा संघर्ष करावा लागू शकतो.
पंजाबविरुद्धच्या सीझनमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सची फलंदाजी चांगली होती. पण त्याच्या गोलंदाजांनी खूप निराशा केली, विशेषतः भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. अशा परिस्थितीत त्याला या सामन्यात त्याच्या गोलंदाजीवर काम करावे लागेल. गुजरातच्या संघात वॉशिंग्टन सुंदरसारखा गोलंदाजही आहे, पण इम्पॅक्ट सब नियमामुळे त्याला किती संधी मिळेल हे पाहणे बाकी आहे. तथापि, गुजरातची फलंदाजी मजबूत आहे. पण गेल्या सामन्यात रदरफोर्डने ज्या पद्धतीने संघर्ष केला ते लक्षात घेता, ग्लेन फिलिप्सचा दावा अधिक मजबूत होतो.
शुभमन गिल (कर्णधार), साई सुधरसन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड/ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, आर साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
जर आपण मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग ११ बद्दल बोलायचं झालं तर हा संघ आपला समतोल शोधत आहे. तथापि, हार्दिक परतल्यानंतर त्याच्यासाठी गोष्टी खूप सोप्या होतील. पण मुंबईची चिंता रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीची आहे. जर दोघेही लयीत आले तर मुंबईला रोखणे सोपे राहणार नाही. गोलंदाजीत, सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा तरुण विघ्नेश पुथूरवर असतील, परंतु फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्याच्यासाठी ते सोपे नसेल. संघात बदलाला फारसा वाव दिसत नाही, पण रॉबिन मिंजला पंड्यासाठी जागा सोडावी लागू शकते.
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, एस राजू, विघ्नेश पुथुर