Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 मध्ये धावणार मिलिंद सोमण; 5 जानेवारीला पुण्यात होणार आयोजन

फेडरल बँक पुणे मॅरेथॉन २०२५ चे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. ५ जानेवारी २०२५ रोजी हे आयोजन होणार असून फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचे ब्रँड ॲम्बेसेडर मिलिंद सोमण हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 04, 2025 | 04:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 ही नववर्षातील पहिली मॅरेथॉन येत्या 5 जानेवारीला पुण्यात होणार आहे. फिटनेस आयकॉन आणि फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचे ब्रँड ॲम्बेसेडर मिलिंद सोमण हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांनी समुदायाला या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मिलिंद सोमण यांची कारकीर्द मॉडेलिंग, अभिनय आणि फिटनेस क्षेत्रात वैविध्यपूर्ण राहिली आहे. त्यांनी आयर्नमॅन ट्रायथलॉन 15 तास 19 मिनिटांत पूर्ण करून जगभरात ख्याती मिळवली आहे. त्याशिवाय अल्ट्रामॅन ट्रायथलॉनमध्येही यशस्वी सहभाग घेतला आहे. आपल्या फिटनेसविषयक दृष्टिकोनाबाबत ते म्हणाले, “मन हे सर्वात शक्तिशाली स्नायू आहे. तंदुरुस्ती म्हणजे जीवनाचा आनंद सकारात्मक मार्गाने घेणे. फेडरल बँक पुणे मॅरेथॉनमध्ये सर्वांनी सामील व्हावे.”

हार्दिक पांड्यानंतर युझवेंद्र चहल घटस्फोटाच्या वादात? लग्नाच्या 3 वर्षानंतर अखेर होणार वेगळा, कुठे बिनसलं

फेडरल बँकेचे मुख्य विपणन अधिकारी एम. व्ही. एस. मूर्ती याप्रसंगी बोलताना म्हणाले, “फेडरल बँक पुणे मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीचा शुभारंभ हा आमच्यासाठी एक रोमांचक क्षण आहे. फेडरल बँकेसाठी पुणे ही एक अतिशय महत्त्वाची आणि विस्तारणारी बाजारपेठ आहे. नागपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूरमध्ये आमचा बँकीग व्यवसाय विस्तारत असताना मॅरेथॉन्समुळे स्थानिक समुदायाशी जोडण्याची आम्हाला संधी मि‌ळत आहे. कॉस्मोपॉलिटन रुपामुळे पुण्याची इतर राज्यांच्या राजधान्यांशी असलेल्या थेट कनेक्टिव्हिटीमुळे फेडरल बँक पुणे मॅरेथॉन केवळ तेथील धावपटूंनाच पुण्याकडे आकर्षित करत नाही, तर त्यांच्या धावगतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार आणि कुटुंबालासुध्दा या शहराकडे आकर्षित करेल, अशी आम्हाला आशा आहे. आमच्या बँकेतील सहकाऱ्यांनी अभिमान बा‌ळगावा अशा पध्दतीने ते ग्राहकांना सातत्याने प्रदान करत असलेली सेवा त्याचबरोबर समुदायाशी आमचे घट्टपणे जुळलेले बंध याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, अशी आमची नितांत इच्छा आहे. या उत्कृष्ट मॅरेथॉनसाठी तयार झालेला माहौल आणखी वातावरणनिर्मिती करेल, अशी मला खात्री आहे. २०२५ च्या शुभारंभप्रसंगी फेडरल बँक पुणे मॅरेथॉनमध्ये धावपटूंच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत सोशल मीडियावरील विविध पोस्ट आणि त्यांच्यासंदर्भात झळकणाऱ्या माहितीची मी अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.”

‘द सह्याद्री रन’ असे नाव असलेल्या या मॅरेथॉनमध्ये पुण्याचे सांस्कृतिक व भौगोलिक वैशिष्ट्य उलगडले जाणार आहे. अनुभवी व हौशी धावपटूंसाठी विविध गट ठेवण्यात आले आहेत.

IND vs AUS : पंतच्या दमदार खेळीनंतर भारताच्या संघाकडे १४५ धावांची लीड, वाचा पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिनाचा अहवाल

मॅरेथॉन वेळापत्रक:

  • पूर्ण मॅरेथॉन (42 किमी): प्रारंभ – पहाटे 5:00 वाजता
  • अर्ध मॅरेथॉन (21 किमी): प्रारंभ – पहाटे 5:30 वाजता
  • 10 किमी: प्रारंभ – सकाळी 6:00 वाजता
  • 5 किमी फन रन: प्रारंभ – सकाळी 6:45 वाजता

फेडरल बँक ही भारतातील आघाडीची खासगी बँक असून देशभरात 1,533 शाखा आणि 2,052 एटीएम्स आहेत. 30 सप्टेंबर 2024 रोजी बँकेच्या व्यवसायाची एकूण उलाढाल ₹4.99 लाख कोटी होती. बँकेचे प्रतिनिधी कार्यालय दुबई व अबू धाबी येथे असून ती एनआरआय ग्राहकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मॅरेथॉनच्या तयारीसाठी पुणे सज्ज असून, स्पर्धकांचा उत्साह वाढत आहे!

Web Title: Milind soman to run in federal bank pune marathon 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Marathon

संबंधित बातम्या

ALIBAUG : अलिबागमध्ये ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न!
1

ALIBAUG : अलिबागमध्ये ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.