फोटो सौजन्य – X (Cognizant Major League Cricket)
MI New York vs. Washington Freedom MLC Final : मेजर क्रिकेट लीग 2025 चे दोन्ही सेमी फायनलचे सामने पार पडले. फायनलचा सामन्यामध्ये कोणते दोन संघ खेळणार आहेत हे पक्के झाले आहे. मेजर क्रिकेट लीगच्या फायनलच्या सामन्यांमध्ये एमआय न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन फ्रीडम हे दोन संघ खेळताना दिसणार आहेत. एमआय न्यूयॉर्कचे कर्णधारपद हे पहिल्यांदाच निकोलस पुरण सांभाळत आहे. तर वॉशिंग्टन फ्रीडम या संघाचे कर्णधार पद हे ग्लेन मॅक्सवेल सांभाळताना दिसत आहे.
एमआय न्यूयॉर्कच्या संघाबद्दल सांगायचे झाले तर या स्पर्धेमध्ये या आतापर्यंत दहा सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी तीन सामने जिंकले होते तर सात सामनात त्यांचा पराभव झाला होता. प्लेऑफच्या सामन्यांमध्ये या संघाने चांगली कामगिरी केली होती. प्लेऑफच्या सामन्यामध्ये टेक्सास सुपर किंग विरुद्ध एमआय न्यूयॉर्क या दोन संघांमध्ये सामना पार पडला या सामन्यात एम आय न्यूयॉर्कच्या संघाने सहा बॉल शिल्लक असताना सात विकेट्स ने लक्ष पूर्ण करून फायनल मध्ये स्थान पक्के केले आहे.
टेक्सास सुपर किंग्स या संघाने या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. डुप्लेसीच्या नेतृत्वाखाली संघाने पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले होते पण प्लेऑफच्या सामन्यांमध्ये संघ फेल झाला आणि स्पर्धेबाहेर झाला आहे. वॉशिंग्टन सुंदर या संघाने पॉइंट टेबल मध्ये पहिले स्थान पटकावले होते. लय मॅक्सवेल चे नेतृत्वाखाली संघाने कमालीची कामगिरी केली होती दहा सामन्यांमध्ये आठ सामन्यांमध्ये विजय मिळवून संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले.
DON’T CALL IT A COMEBACK ‼️ @MINYCricket‘s moving on to the Championship final! 🏆 pic.twitter.com/a0Q0g3F3Wb
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) July 12, 2025
शेवटचा सामना त्यांचा टेक्सास सुपर किंग्स विरुद्ध नऊ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता पण हा सामना झाला नाही आणि पॉइंट टेबलमध्ये वॉशिंग्टन फ्रीडम हा संघ पहिला स्थानावर असल्यामुळे त्यांना डायरेक्ट फायनलचे स्थान मिळाले. एम आय न्यूयॉर्क विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यामध्ये फायनल चा सामना खेळवला जाणार आहे हा सामना 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे या सामनाचे आयोजन ग्रँड प्रायरी क्रिकेट मैदानावर करण्यात आले आहे.