फोटो सौजन्य – X
जसप्रीत बुमराहची पत्रकार परिषद : भारत विरूद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिले गोलंदाजी केली आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने संघाला 5 विकेट्स मिळवुन दिले. तर मोहम्मद सिराज याने संघाला दोन विकेट्स मिळवुन दिले. काल भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या दिनाच्या खेळाच्या समाप्तीनंतर जसप्रीत बुमराह हा पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होता.
आता बुमराह लॉर्ड्सवर परतला आहे आणि त्याने ५ बळी घेतले आहेत आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याच्या टीकाकारांना उत्तर दिले आहे. पत्रकार परिषदेत जेव्हा जसप्रीत बुमराहला विचारण्यात आले की शेवटची कसोटी न खेळल्यामुळे झालेल्या टीकेबद्दल तो काय म्हणू इच्छितो. यावर बुमराहने उत्तर दिले, “माझ्याद्वारे प्रत्येकजण पैसे कमवत आहे, ते मला आशीर्वाद देतील. जोपर्यंत मी जर्सी घालत आहे तोपर्यंत लोक माझे मूल्यांकन करतील. सचिन सरांनी २०० कसोटी सामने खेळले आहेत, पण त्यांनाही मूल्यांकन केले जाते.”
IND vs ENG : बुम बुम बुमराह… 5 फलंदाजांना पाठवलं पव्हेलियनमध्ये! केएल राहुलचे अर्धशतक, वाचा कसोटीच्या दुसऱ्या दिनाचा अहवाल
त्यानंतर सोशल मिडीयावर जसप्रीत बुमराहचा पत्रकार परिषदेमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना पत्रकाराचा फोनची रिंग वाजली तेव्हा तो म्हणाला की, कोणाची तरी पत्नी फोन करत आहे, पण मी फोन उचलणार नाही, मी त्याला तसेच ठेवतो त्यानंतर तिथे असलेले सर्व पत्रकार जोरजोरात हसायला लागले.
“Somebody’s wife is calling!”
Jasprit Bumrah reacts to a reporter’s phone going off during a press conference 😂 pic.twitter.com/SSfa9akUKZ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 11, 2025
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, जसप्रीत बुमराहने लॉर्ड्स कसोटीत पाच विकेट्स घेत पहिल्यांदाच लॉर्ड्सच्या सन्मान बोर्डावर आपले नाव नोंदवले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हा त्याचा १५ वा ५ विकेट्स होता. जसप्रीत बुमराहच्या या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाने यजमान संघाला ३८७ धावांवर रोखण्यात यश मिळवले. बुमराहच्या ५ विकेट्समध्ये हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स आणि जो रूट यांच्या मोठ्या विकेट्स, ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्या विकेट्सचा समावेश आहे.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर भारताने ३ विकेट गमावून १४५ धावा केल्या आहेत. केएल राहुल अर्धशतक झळकावल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे, तर ऋषभ पंत त्याला साथ देत आहे. भारत अजूनही यजमान संघापासून २४२ धावांनी मागे आहे.