फोटो सौजन्य – X (Cognizant Major League Cricket)
एमएलसी २०२५ चा अंतिम सामना 14 जुलै रोजी खेळला जाणार आहे. एमआय न्यू यॉर्क (MINY) ने अंतिम फेरीत प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला पहिल्या ७ पैकी ६ सामन्यांमध्ये पराभव पत्करणारा हा संघ आता विजेतेपद जिंकण्यासाठी आज वॉशिंग्टन फ्रीडमशी सामना करेल. कर्णधार निकोलस पूरनचा एमआय न्यू यॉर्क तीन हंगामात दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळत आहे आणि त्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याची संधी आहे.
त्याच वेळी, गतविजेत्या वॉशिंग्टन फ्रीडम संघाने या हंगामात लीग टप्प्यात वर्चस्व गाजवले आणि पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले. या हंगामात, त्यांनी दोन्ही वेळा एमआय न्यू यॉर्कला पराभूत केले आहे. प्लेऑफमध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि टेक्सास सुपर किंग्ज सारख्या बलाढ्य संघांना हरवून MINY ने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर वॉशिंग्टन फ्रीडमला पात्रता फेरीत पावसामुळे न खेळता अंतिम फेरीचे तिकीट मिळाले. चला तर मग जाणून घेऊया चाहते MLC फायनल सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह मोफत पाहू शकतात?
And then there were two 😮💨
Sure to be a showdown of epic proportions, the @WSHFreedom will take on @MINYCricket in a rip-roaring battle for the championship title. 🏆
Tickets are selling fast. Grab yours before they’re gone. 👇https://t.co/npj3rgNddh pic.twitter.com/d6TBB7DVRB
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) July 12, 2025
एमएलसी २०२५ चा अंतिम सामना रविवार, 14 जुलै २०२५ रोजी वॉशिंग्टन फ्रीडम आणि एमआय न्यू यॉर्क यांच्यात खेळला जाईल. वॉशिंग्टन फ्रीडम विरुद्ध एमआय न्यू यॉर्क या दोन संघामध्ये मेजर क्रिकेट लीग फायनल २०२५ सामना टेक्सासमधील ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत वैभव सूर्यवंशीची बॅट फेल, आयुष म्हात्रेने केला कहर
भारतीय वेळेनुसार, सामना १४ जुलै रोजी सकाळी ५:३० वाजता सुरू होईल, तर स्थानिक वेळेनुसार, सामना आज म्हणजेच १३ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता टेक्सासमध्ये खेळला जाईल. अंतिम सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. एमएलसी २०२५ चा अंतिम सामना जिओ सिनेमा आणि डिस्ने+ हॉटस्टार अॅप्स आणि वेबसाइटवर मोफत पाहता येईल.
एमआय न्यू यॉर्कने मेजर लीग क्रिकेट-२०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी क्वालिफायर-२ मध्ये संघाने टेक्सास सुपर किंग्जवर सात विकेट्सने दमदार विजय मिळवला. आता एमआय न्यू यॉर्कचा सामना जेतेपदाच्या सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडमशी होईल. हा सामना १४ जुलै रोजी खेळला जाणार आहे.