फोटो सौजन्य – X (ECB)
भारत विरुद्ध इंग्लंड अंडर 19 युवा संघात मध्ये कसोटी मालिकेला १२ जुलैपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व हे आयुष म्हात्रे करत आहेत तर पोलीस संघाची नेतृत्व हे हमजा शेख हा करत आहे. या सामन्याच्या आयोजन काउंटि क्रिकेट मैदानावर करण्यात आले आहे. पहिल्या दिनी भारताच्या संघाने सात विकेट्स गमावून 88 ओव्हर मध्ये 450 धावा केल्या आहेत. त्यामध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
कर्णधार आयुष म्हात्रेने पांढऱ्या चेंडूच्या फॉर्ममध्ये खराब कामगिरीवर मात करत शानदार शतक झळकावले आणि शनिवारी पहिल्या ‘युवा कसोटी’च्या पहिल्या दिवशी इंग्लंडविरुद्ध भारताच्या अंडर-१९ संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायला भाग पाडले. भारताच्या अंडर-१९ संघाने पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा सात बाद ४५० धावा केल्या होत्या. भारतीय संघासाठी स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला त्याने फक्त 14 धावा केल्या आणि विकेट गमावली.
HUNDRED FOR CAPTAIN AYUSH MHATRE 💛
– First four day match against England U-19, Captain stands for India, scored Hundred from just 107 balls, What a knock, the future of Indian Cricket is here. pic.twitter.com/VbtGDDBUyk
— Johns. (@CricCrazyJohns) July 12, 2025
तर एकदिवसीय मालिकेत संघर्ष करणाऱ्या म्हात्रेने १४ चौकार आणि दोन षटकारांसह ११५ चेंडूत १०२ धावा करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याची साथ विहान मल्होत्रा याने दिली त्याने पहिल्या दिनी ६७ धावा केल्या आणि सोबत दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी केली. या जोडीच्या बाद झाल्यानंतर, अभिज्ञान कुंडू याने ९५ चेंडूत ९० धावा केल्या यामध्ये त्याने 10 चौकार मारले आणि 1 षटकार मारला. राहुल कुमार ८१ चेंडूत ८५ शतके हुकले पण त्यांनी आक्रमक फलंदाजी सुरू ठेवत संघाला ४०० धावांच्या जवळ नेले.
या दोघांनी पाचव्या विकेटसाठी फक्त २७.४ षटकांत १७९ धावांची भागीदारी केली. कुंडूने १० चौकार आणि एक षटकार मारला, तर कुमारने १४ चौकार आणि एक षटकार मारून अधिक आक्रमक कामगिरी केली. इंग्लंडकडून मायकेल वॉनचा मुलगा आर्ची वॉनने म्हात्रेसह दोन विकेट्स घेतल्या. त्याच्या ऑफ-ब्रेक गोलंदाजीने भारतीय फलंदाजांनी १७ षटकांत १०८ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा आरएस अम्ब्रिस ३१ आणि हेनिल पटेल ६ धावांवर खेळत होते.