Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ माजी क्रिकेटपटूच्या नव्या इनिंगला सुरुवात! माजी कर्णधार घेणार तेलंगण राज्याच्या मंत्रीपदाची शपथ 

माजी क्रिकेटपटू आणि एमएलसी मोहम्मद अझरुद्दीन यांची तेलंगण सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांचा शपथविधी शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी राजभवन येथे होणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 29, 2025 | 08:27 PM
This former cricketer's new innings begins! Former captain to take oath as Telangana state minister

This former cricketer's new innings begins! Former captain to take oath as Telangana state minister

Follow Us
Close
Follow Us:
  •  ​​माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन तेलंगण सरकारमध्ये मंत्री होणार 
  • ३१ ऑक्टोबर रोजी राजभवन येथे शपथविधी
  • अझरुद्दीन यांनी २००९ मध्ये राजकारणाची सुरुवात 

Telangana Cabinet Minister Azharuddin Congress: ​​माजी क्रिकेटपटू आणि एमएलसी मोहम्मद अझरुद्दीन यांची तेलंगण सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेणार आहे. त्यांचा शपथविधी शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी राजभवन येथे पार पडणार आहे. या निर्णयाचे मुख्य कारण म्हणजे ११ नोव्हेंबर रोजी होणारी ज्युबिली हिल्स विधानसभा जागेची पोटनिवडणूक हे ठरले आहे. या मतदारसंघात अंदाजे ३०% मुस्लिम मतदार असल्याने झरुद्दीनच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठा फायदा होणार असल्याची काँग्रेसला आशा आहे.

हेही वाचा : IND vs AUS 1st T20 : ‘मिस्टर 360’ कडून ‘थाला’ चा विक्रम उद्ध्वस्त! ‘या’ बाबतीत सूर्यकुमार यादवने धोनीला टाकले मागे

पहिले मुस्लिम मंत्री…

सध्या, तेलंगणा काँग्रेस सरकारमध्ये एक देखील मुस्लिम मंत्री नाही. यामुळे मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व सरकारकडे नसल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. अझरुद्दीनच्या समावेशामुळे ही पोकळी भरून निघणार असल्याचे बोलले जात आहे. अझरुद्दीनच्या समावेशामुळे, रेवंत रेड्डी मंत्रिमंडळात आता एकूण १६ मंत्री होणार आहेत. जे राज्यातील कमाल १८ आहेत.

मुस्लिम मतदार निर्णायक

ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात अंदाजे ३.९० लाख मतदार संख्या आहे. त्यापैकी १.२० ते १.४० लाख संख्या ही मुस्लिम समुदायची  आहे. याचा अर्थ प्रत्येक तिसरा मतदार मुस्लिम समुदायाचा आहे. म्हणूनच मुस्लिम मतांचा निकालावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणारा आहे. अझरुद्दीनला मंत्री म्हणून नियुक्त करून काँग्रेसकडून मुस्लिम समुदायावरील आपला विश्वास मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यावेळी पोटनिवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार…

  1. बीआरएसकडून मंगंती सुनीता गोपीनाथ
  2. काँग्रेसकडून वल्लाला नवीन यादव
  3. भाजपकडून लंकाला दीपक रेड्डी
  4. अझरुद्दीन २०२३ मध्ये पराभूत झाले.

अझरुद्दीन यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत ज्युबिली हिल्समधून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु बीआरएस उमेदवार मगंती गोपीनाथ यांच्याकडून त्यांना  १६,३३७ मतांनी पराभव पत्करावा लागला. बीआरएसला ८०,५४९ मते मिळाली, तर काँग्रेस (अझरुद्दीन) ला ६४,२१२ मते मिळाली होती.

अझरुद्दीन यांचा क्रिकेट ते संसद प्रवास

अझरुद्दीन यांनी २००९ मध्ये मुरादाबाद येथून काँग्रेस खासदार म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. २०१४ मध्ये त्यांनी राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. नंतर २०१८ मध्ये त्यांना तेलंगणा काँग्रेसचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले होते.

क्रिकेट कारकीर्द

  • कसोट्या – ६२१५ धावा
  • एकदिवसीय – ९३७८ धावा
  • सर्वोत्तम कसोटी धावसंख्या – १९९ धावा
  • सर्वोत्तम एकदिवसीय धावसंख्या – १५३ धावा

हेही वाचा : IND vs AUS 1st T20 : ‘सूर्यकुमार यादवने रचला इतिहास! ‘मिस्टर 360’ ची T20 मध्ये ‘या’ विक्रमात अव्वल स्थानी एंट्री

 

Web Title: Mohammad azharuddin to be sworn in as minister in telangana government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 08:27 PM

Topics:  

  • Mohammad Azharuddin

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.