महेंद्रसिंग धोनी आणि सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
Suryakumar Yadav replaces Vikram in MS Dhoni’s T-20 : २९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे खेळलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला, परंतु हा सामना १० ओव्हर देखील पूर्ण होऊ शकला नाही. पावसामुळे सामना रद्द कावाया लागला. वाया गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आणि ९.४ षटकांत १ बाद ९७ धावा केल्या. परंतु, पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. शुभमन गिल २० चेंडूत ३७ धावांवर नाबाद राहिला, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने २४ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. या दरम्यान सूर्यकुमार यादवने भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे.
पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही. हा सामना रद्द करण्यात आला. तरी देखील सूर्यकुमार यादवने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात त्याने दोन शानदार षटकार मारले आणि त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १५० षटकारांचा टप्पा सर केला. या कामगिरीसह त्याने आणखी एक खास विक्रम रचला आहे.
सूर्याने मोडला धोनीचा विक्रम
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सूर्यकुमार यादवने आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला देखील आता पिछाडीवर टाकले आहे. २००७ ते २०१९ दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ सामन्यांच्या १५ डावात धोनीने ३१३ धावा फटकावल्या आहेत. तर सूर्यकुमार यादवने फक्त १० सामन्यांमध्ये ३६.५५ च्या सरासरीने ३२९ धावा करून धोनीला ओव्हर टेक केले आहे.
सूर्यकुमार यादव आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. या विक्रमासह, एमएस धोनीला एका स्थानाचा फटका बसला आहे. टो आता पाचव्या स्थानी गेला आहे.
सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या जलद ३९ धावा त्याच्या खराब फॉर्मनंतर त्याला फॉर्ममध्ये परतल्याचा पुरावा देत आहेत. २०२५ च्या आशिया कपमध्ये त्याची बॅट खूपच शांत राहिली होती. या स्पर्धेतील सात सामन्यांमध्ये तो एकही अर्धशतक झळकावू शकला नाही, मात्र आज त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने आपण फॉर्म मध्ये परतल्याचे दाखवून दिले आहे.






