
फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मिडिया
भारताचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये मोहम्मद सिराज आणि यशस्वी जयस्वाल यांसारखे खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे बीसीसीआयवर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. तर भारतामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्राॅफीचे सामने देखील खेळवले जात आहेत. भारतीय टी-२० संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार गोलंदाजी करून मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
टी-२० विश्वचषकापूर्वी टी-२० क्रिकेटमधील भारतीय वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, अष्टपैलू हार्दिक पंड्या व्यतिरिक्त, संघात जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा असे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. सातत्याने चांगली कामगिरी करून आणि कठोर परिश्रम करूनही, मोहम्मद सिराज संघाबाहेर आहे कारण तो हर्षित जितके सक्षम आहे तितके फलंदाजीत योगदान देऊ शकत नाही.
पण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, मोहम्मद सिराजने मुंबईविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिले की त्याच्याकडे एकट्याने गोलंदाजीने सामना कसा उलटवण्याची क्षमता आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात, मोहम्मद सिराजने हैदराबादकडून खेळला आणि ३.५ षटकांत फक्त १७ धावा देत ३ बळी घेतले. सिराजच्या शानदार स्पेलमुळे हैदराबादने मुंबईला १३१ धावांवर रोखले.
हैदराबादकडून धावांचा पाठलाग करताना तन्मय अग्रवालने चमक दाखवली, त्याने १३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४० चेंडूत ७५ धावा केल्या. हैदराबादने ११.५ षटकांत ९ विकेट्स गमावून सामना जिंकला. मोहम्मद सिराजला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मोहम्मद सिराजने शेवटचा टी-२० सामना २०२४ मध्ये खेळला होता. टी-२० विश्वचषक योजनेतून वगळण्यात आले असले तरी, तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवत आहे आणि त्याचे कौशल्य बळकट करण्यासाठी काम करत आहे.
6️⃣ balls, 2️⃣ wickets, sirf 1️⃣ Mohammed Siraj! ⚡
pic.twitter.com/T9elDsnu9B — Gujarat Titans (@gujarat_titans) December 12, 2025
हैदराबादविरुद्ध मुंबईचा स्टार फलंदाजीचा क्रम खराब झाला. यशस्वीने २० चेंडूत २९ धावा करत दमदार सुरुवात केली. तथापि, तो त्याच्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही. अजिंक्य रहाणे फक्त ९ धावांवर बाद झाला. सरफराज खानने फक्त ५ धावा केल्या, तर अंगकृष रघुवंशीने १ चेंडूचा सामना करूनही फक्त ४ धावा केल्या.
मुंबईने नियमित अंतराने विकेट गमावल्या आणि त्यांचा संघ फक्त १३१ धावांवरच बाद झाला. हैदराबादने १३२ धावांचे लक्ष्य केवळ ११.५ षटकांतच साध्य केले, फक्त एक विकेट गमावून. अमनने २९ चेंडूत ५२ धावा केल्या आणि नाबाद राहिला. दरम्यान, तन्मयने ४० चेंडूत ७५ धावा केल्या.