IND vs WI 1st Test: Mia Magic! Siraj creates history; He is the only bowler in the world to achieve 'this' Bhim feat
IND vs WI 1st Test, Mohammed Siraj created history : भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघात दोन कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिलं सामना अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणार वेस्ट इंडिज संघ १६२ धावांवर गडगडला. वेस्ट इंडिजकडून जस्टिन ग्रीव्हजने सर्वाधिक ३२ धावा केल्या. तर भारताकडून मोहम्मद सिराजने शानदार कामगिरी करत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह मोहम्मद सिराजने एक मोठा कारनाम केला आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली. या दरम्यान गोलंदाजीदरम्यान, सिराजने एक विशेष विक्रम रचला आहे. गेल्या दोन वर्षांत ३०+ कसोटी बळी घेणारा मोहम्मद सिराज हा जगातील एकमेव गोलंदाज ठरला आहे. २०२४ मध्ये, सिराजने ३५ बळी मिळवले होते. या वर्षी, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सीराजने आतापर्यंत एकूण ३० बळी घेतले आहेत. सिराज २०२५ च्या WTC मध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज देखील बनला आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांवरच आटोपला. यामध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने ४ बळी घेण्याची किमया साधली आहे. भारतात खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये मोहम्मद सिराजची ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.
हेही वाचा : Ind vs WI : शुभमन गिलला इतिहास रचण्याची नामी संधी! वेस्ट इंडिजविरुद्ध डॉन ब्रॅडमनचा विक्रम रडारवर
भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज हा अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता, त्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये २३ बळी टिपले होते. आता पुन्हा एकदा वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत, सिराज पहिल्याच सामन्यापासून फलंदाजांवर आपले वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत आहे. त्याने पहिल्याच सामन्यात ४ बळी घेतले आहेत.
हेही वाचा : IND vs WI : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर गुडाळलं, मोहम्मद सिराजच्या हाती लागला विजयाचा चौकार
भारताचा प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिजचा प्लेइंग इलेव्हन
रोस्टन चेस (कर्णधार), तेजनारायण चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, अॅलिक अथानाझे, ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, खॅरी पियरे, जोहान लायन, जेडेन सील्स.