Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोईंगमध्ये महाराष्ट्राच्या मृण्मयीने केलं रौप्य पदक नावावर! ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील गुरूवारी पदकावर नेम साधणार

नाशिकच्या मृण्मयी हिने सिंगल स्कल प्रकारातील दोन किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. गुरुवारी सकाळी १० वाजता अंतिम फेरीचा थरार रंगणार आहे, यामध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता खेळताना दिसेल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 06, 2025 | 09:36 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

डेहराडून : सध्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु आहे यामध्ये महाराष्ट्राचे खेळाडू कमालीची कामगिरी करताना दिसत आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक तर गुरप्रताप सिंग याने कास्यपदक जिंकून रोईंग स्पर्धेतील सलामीच्या दिवशी शानदार कामगिरी केली. नाशिकच्या मृण्मयी हिने सिंगल स्कल प्रकारातील दोन किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. तिला हे अंतर पार करण्यास ८ मिनिटे ४७.६ सेकंद वेळ लागला. मध्यप्रदेशच्या खुशप्रीत कौर हिने हे अंतर ८ मिनिटे ४०.३ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले.

मृण्मयी हिने २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कास्यपदक जिंकले होते, तर २०२३ मध्ये तिने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याबाबत मला खात्री होती. त्या दृष्टीनेच मी नियोजन केले होते. रौप्य पदक मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. कारण दोन वर्षांपूर्वी या क्रीडा स्पर्धेत मला कास्यपदक मिळाले होते. येथील पदक मला भावी कारकीर्दीसाठी निश्चितच उपयोगी पडणार आहे, असे मृण्मयी हिने सांगितले.

पुरुष महिला संघांनी हॉकीत महाराष्ट्राची धडाकेबाज सलामी, तामिळनाडू संघाला केलं पराभूत

पुरुषांच्या सिंगल स्कल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा आर्मी रोईंग सेंटरचा खेळाडू गुरप्रताप सिंग याने दोन किलोमीटरचे अंतर ८ मिनिटे ४ सेकंदात पार केले. सेनादलाचा बलराज पन्वर (७ मिनिटे २६.६ सेकंद) व उत्तराखंडचा नवदीप सिंग (७ मिनिटे ४१.१० सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकाविले. पुण्याचा खेळाडू गुरप्रताप सिंग याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने यापूर्वी सेनादलाकडून भाग घेताना अखिल भारतीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे.

स्वप्नील कुसाळे आज पदकावर नेम साधणार

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीच्या ५० मिटर रायफल थ्री पोझिशनमध्ये अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरी गाठली. गुरुवारी सकाळी १० वाजता अंतिम फेरीचा थरार रंगणार आहे. महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशूल शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने एकूण ५८८ गुणांची कमाई करीत पाचव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. त्याने नीलिंग (गुडघ्यावर बसून) पोझिशनमध्ये १९५, प्रोन (झोपून) पोझिशनमध्ये २००, तर स्टॅडींग (उभे राहून) पोझिशनमध्ये १९३ अशी एकूण ५८८ गुणांची कमाई करीत अंतिम फेरीची पात्रता मिळविली.

पात्रता फेरीत मध्यप्रदेशच्या प्रताप सिंग तोमरने ५९८ गुणांसह अव्वल स्थान मिळविले. चैन सिंग (५९४), नीरज कुमार (५९१) आणि निशान बुधा (५८९) या सेनादलाच्या नेमबाजांनी अनुक्रमे दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकासह अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती व दोन वेळची ऑलिंपियन नेमबाज असलेल्या राही सरनोबतकडून महाराष्ट्राला पदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र, महिलांच्या १० मिटर एअर पिस्तूल प्रकारात ही कोल्हापूरची सुकन्या चौथ्या स्थानावर राहिल्याने चाहत्यांची निराशा झाली.

Web Title: Mrunmayi of maharashtra won a silver medal in rowing olympic medalist swapnil will name the medal on thursday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 09:18 AM

Topics:  

  • Team India

संबंधित बातम्या

IND vs SA : भारताच्या फलंदाजांनी लाज घालवली… दक्षिण आफ्रिकेने 30 धावांनी जिंकला सामना! वाचा सामन्याचा संपूर्ण अहवाल
1

IND vs SA : भारताच्या फलंदाजांनी लाज घालवली… दक्षिण आफ्रिकेने 30 धावांनी जिंकला सामना! वाचा सामन्याचा संपूर्ण अहवाल

‘RIP Test Cricket’ का म्हणाला असं हरभजन सिंह? India vs South Africa कसोटी सामना पाहिल्यानंतर संतापला भज्जी
2

‘RIP Test Cricket’ का म्हणाला असं हरभजन सिंह? India vs South Africa कसोटी सामना पाहिल्यानंतर संतापला भज्जी

IND vs SA : टेम्बा लढला पण…दक्षिण आफ्रिकेला 153 धावांवर गुंडाळलं! भारतासमोर 124 धावांचे लक्ष्य, वाचा सामन्याचा अहवाल
3

IND vs SA : टेम्बा लढला पण…दक्षिण आफ्रिकेला 153 धावांवर गुंडाळलं! भारतासमोर 124 धावांचे लक्ष्य, वाचा सामन्याचा अहवाल

IND vs SA : भारताच्या अडचणी वाढल्या, शुभमन गिल आयसीयूमध्ये एडमिट! जाणून घ्या कशी आहे कर्णधाराची तब्येत?
4

IND vs SA : भारताच्या अडचणी वाढल्या, शुभमन गिल आयसीयूमध्ये एडमिट! जाणून घ्या कशी आहे कर्णधाराची तब्येत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.