महेंद्रसिंह धोनी : 18 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये लढत होणार आहे. उद्याचा हा हाय व्होल्टेज सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना चेन्नई आणि बंगळुरू या दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. या सामन्यांमध्ये जो संघ विजयी होईल तो संघ आयपीएल 2024 प्लेऑफसाठी चौथे स्थान पक्के करेल. हा सामना शनिवारी होणार आहे परंतु चेन्नई सुपर किंग्सचा संघ 2 दिवसाआधीच बंगळुरूला गेला आहे. या सामन्यापूर्वीच एका व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
[read_also content=”सनरायझर्स हैदराबादने लावला स्वतःवर ‘Q’ चा ठप्पा, कोणता संघ होणार प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? https://www.navarashtra.com/sports/sunrisers-hyderabad-qualify-for-playoffs-chennai-super-kings-vs-royal-challengers-bangalore-534270.html”]
व्हायरल व्हिडीओ
रॉयल चॅलेंन्जर्स बंगळुरूच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनीने आरसीबी ड्रेसिंग रूममध्ये चहाचा आनंद घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की एमएस धोनी डिस्पोजेबल ग्लास घेऊन उभा आहे आणि आरसीबी जर्सी घातलेल्या सदस्यांकडून चहाची मागणी करत आहे. आरसीबीने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला, जो काही क्षणातच व्हायरल झाला. व्हिडिओ शेअर करताना आरसीबीने कॅप्शन लिहिले, “बेंगळुरूमध्ये माही तुमचे स्वागत आहे.”
या व्हिडिओची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. काही एमएस धोनीने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्याला चहा पिणे आवडते. धोनी म्हणाला होता की, तो एक छोटासा म्हातारा माणूस आहे, त्याला चहा प्यायला आवडतो. ‘थाला’ रांचीमध्ये जेव्हा आम्ही आमच्या मित्रांना भेटतो तेव्हा आम्ही चहाचा आनंद घेतो. मैदानावरील सराव सत्र पूर्ण केल्यानंतर त्याला एक कप चहा घेणे आवडते.
गुणतालिकेचे गणित
गुणतालिकेचा विचार केला असता कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघानी प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. कोलकाता नाईट राइडर्सचा संघ 19 गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर राजस्थानचा संघ 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादचा गुजरात टायटन्सविरुद्ध सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या चौथ्या स्थानासाठी चेन्नई आणि बंगळुरू यांच्यामध्ये लढत सुरु आहे.