Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neeraj Chopra चं जबरदस्त कमबॅक! सीझन बेस्ट थ्रोसह Lausanne Diamond League मध्ये दुसऱ्या स्थानावर

Neeraj Chopra Finishes 2nd in Lausanne diamond League: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लुसाने डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र, त्याने या हंगामातील आपला सर्वोत्तम थ्रो केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 22, 2026 | 01:42 PM
Photo- Social media

Photo- Social media

Follow Us
Follow Us:
  • लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा जलवा
  • सीझनमधील सर्वोत्तम थ्रोसह दुसऱ्या स्थानावर
  • रुमेशने पटकावले पहिले स्थान
भारतीय स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची डायमंड लीग २०२६ मध्ये चमकदार कामगिरी दिसून आली. नीरजने या हंगामातील सर्वोत्तम थ्रो केला. पण तरीही तो दुसऱ्या स्थानावर राहिला.राष्ट्रकुल क्रीडा २०२६च्या स्पर्धेनंतर ही नीरजची पहिली स्पर्धा होती. नीरजने पहिल्या फेरीत ८३.५४ मीटर थ्रो करुन स्पर्धेची प्रभावी सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याने या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करत ८८.०५ मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावले.तो केवळ ९ सेंटिमीटरने विजेतेपदापासून दूर राहिला. श्रीलंकेच्या रुमेश थरंगाने ८८.१४ मीटर थ्रो करून पहिले स्थान पटकावले. कोणत्याही स्पर्धेतील हा त्याचा सलग पाचवा विजय आहे.

भारताच्या लेकीचा कुस्तीत डंका! काजल पुन्हा विश्वविजेती; U20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसरे ‘सुवर्ण’

१४ महिन्यांनंतर नीरजची सर्वोत्तम कामगिरी

लुसाने डायमंड लीग स्पर्धेत २८ वर्षीय नीरज समोर सर्वात मोठे आव्हान श्रीलंकेचा रुमेश थरंगा पाथिरागे होता. नीरज चोप्राची स्पर्धेची सुरुवात खराब झाली, त्याने आपल्या पहिल्या प्रयत्नात केवळ ८३.५४ मीटरचा थ्रो केला. दरम्यान, श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिरागेने आपल्या पहिल्या प्रयत्नात ८५.९९ मीटरचा थ्रो करून आघाडी घेतली. परंतु, नीरजने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात जोरदार कमबॅक केले आणि ८८.०५ मीटरचा थ्रो करून अव्वल स्थान पटकावले, जो त्याचा या हंगामातील सर्वोत्तम थ्रो होता. दरम्यान, रुमेशने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ८७.०६ मीटरचा थ्रो केला.ही नीरजची या हंगामातील सर्वोत्तम फेकही होती, यापूर्वी त्याने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८५.८३ मीटर थ्रो केला होता.

रुमेशने पटकावले पहिले स्थान

रुमेशपाथिरागेने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात बाजी पलटवली. पाथिरागेने ८८.१४ मीटर भाला फेकला. जे नीरजच्या थ्रोपेक्षा फक्त ८ सेंटीमीटरने लांब होता. या शानदार कामगिरीमुळे त्याने पुन्हा पहिले स्थान पटकावले. तर नीरजने तिसऱ्या फेरीत ८३.७२ मीटर थ्रो केला. चौथ्या फेरीत नीरजचा फाऊल झाला. तर पाचव्या फेरीत त्याने थ्रो न फेकण्याचा निर्णय घेतला. तर त्याचा सहावा प्रयत्न केवळ ८२.१५ मीटरचा होता. दरम्यान, रुमेशने पाचव्या आणि सहाव्या प्रयत्नात फाऊल केला. मात्र, रुमेशची तिसरी फेक निर्णायक ठरली. २३ वर्षीय रुमेश पाथिरागे या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने लुसानेमध्येही आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवत प्रथम स्थान पटकावले. तर, ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८६.६९ मीटर थ्रो करून तिसरे स्थान पटकावले. त्याने आपल्या सहाव्या आणि अंतिम प्रयत्नात हे अंतर गाठले. हा त्याचा स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो होता.

नीरजने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये जिंकले रौप्य पदक

यापूर्वी, नीरज चोप्राने स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये ८५.८३ मीटर थ्रो करून रौप्य पदक जिंकले होते. मात्र, या स्पर्धेतही नीरज सर्वोत्तम फॉर्ममध्ये नव्हता. तर, याच स्पर्धेत श्रीलंकेच्या रुमेशने ८९.७५ मीटर थ्रो करून सुवर्ण पदक जिंकले होते.

IND vs SL: मालिका वाचवण्यासाठी श्रीलंकेचा मोठा डाव! दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर, दोन नव्या खेळाडूंची एन्ट्री

Web Title: Neeraj chopra finishes 2nd lausanne diamond league 2026 88 05 season best

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Diamond League
  • Neeraj Chopra
  • Sri Lanka

संबंधित बातम्या

Lausanne Diamond League: नीरज चोप्रा पुन्हा मैदानात! डायमंड लीगमध्ये रुमेश पाथिरागेचे तगडे आव्हान; कधी अन् कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन
1

Lausanne Diamond League: नीरज चोप्रा पुन्हा मैदानात! डायमंड लीगमध्ये रुमेश पाथिरागेचे तगडे आव्हान; कधी अन् कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेचा पुन्हा धुव्वा उडणार? Team India व्हाईटवॉशच्या तयारीत! दुसरा कसोटी सामना कधी?
2

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेचा पुन्हा धुव्वा उडणार? Team India व्हाईटवॉशच्या तयारीत! दुसरा कसोटी सामना कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.