Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neeraj Chopra च्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ खास पदवीसह प्रादेशिक सैन्यात मिळाली मोठी जबाबदारी.. 

भारतासाठी दोन ऑलिंपिक पदके जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचा मोठा सन्मान करण्यात आला आहे. नीरज चोप्राचा भारतीय सैन्याकडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 15, 2025 | 07:27 AM
A crown of honor on Neeraj Chopra's head! He got a big responsibility in the regional army with this special title..

A crown of honor on Neeraj Chopra's head! He got a big responsibility in the regional army with this special title..

Follow Us
Close
Follow Us:

Neeraj Chopra : भारतासाठी दोन ऑलिंपिक पदके जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला गेला आहे. त्याला  एक विशेष पदक मिळाले आहे. नीरज चोप्राचा भारतीय सैन्याकडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. चोप्राला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलचे मानद पद देण्यात आले आहे. २०२० च्या ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून भारताची मान जगात ताठ केली.  त्याच वेळी, त्याने २०२४ च्या ऑलिंपिकमध्ये देखील रौप्य पदकाची कमाई करून पुन्हा देशाचे नाव उंचावले.

संरक्षण मंत्रालयाची नीरज चोप्रा यांना सन्मानित करण्याची घोषणा भारत सरकारच्या मासिक गॅझेट ऑफ इंडियामध्ये करण्यात आली होती. त्याला हा दर्जा १६ एप्रिल २०२५ पासून लागू झाला आहे. याआधी नीरज चोप्रा प्रादेशिक सैन्यात सुभेदार पदावर होता. आता त्याला प्रमोशन देण्यात आले आहे. त्यानंतर चोप्रा  लेफ्टनंट कर्नल झाला आहे.

हेही वाचा : ICC Ranking : Ravindra Jadeja ने रचला भला मोठा इतिहास! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला पहिला अष्टपैलू खेळाडू..

प्रादेशिक सेना म्हणजे नेमकं काय?

प्रादेशिक सेना ही मुख्य सैन्याच्या दुसऱ्या रांगेचे काम करत असते. त्याचे सदस्य हे सामान्य लोक असतात, जे इतर व्यवसायांशी संबंधित आहेत. प्रादेशिक सैन्याच्या सदस्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जाते आणि आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांची मदत घेण्यात येत असते.  प्रादेशिक सैन्याचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे सैन्याला मदत करणे हे असते.

‘हे’ व्यक्ती देखील या सैन्याचा भाग

नीरज चोप्रा याच्यापूर्वी भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि अभिनव बिंद्रा यांसारख्या खेळाडूंना प्रादेशिक सैन्यात मानद पदव्या देण्यात आल्या आहेत. तसेच नाना पाटेकर, सचिन पायलट आणि अनुराग ठाकूर हे देखील या सैन्याचा एक भाग आहेत.

नीरज पोलंडमधील भालाफेक स्पर्धेत होणार सहभागी

पोलंडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा सहभागी होणार आहे. त्याच्यासमोर दोन वेळा विश्वविजेता आणि पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि राष्ट्रीय विक्रमधारक पोलंडचा मार्सिन क्रुकोव्स्की तसेच सायप्रियन मर्झिग्लोड आणि डेव्हिड वॅग्नर सारख्या स्थानिक खेळाडूंचे तगडे आव्हान असणार आहे.

हेही वाचा :Rohit sharma-Virat kohali Retirement : ‘निवृत्त होण्यास मजबूर केले’ विराट-रोहितच्या निवृत्तीमुळे योगराज सिंग निराश! पहा व्हिडिओ

पोलंडमध्ये आयोजित होणारी ही स्पर्धा नीरजसाठी या हंगामातील तिसरी स्पर्धा असणार आहे.  त्याने दक्षिण आफ्रिकेत आपली मोहीम सुरू केली आणि आता तो १६ मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये भाग घेणार आहे. जिथे त्याने २०२३ मध्ये (८८.६७ मीटर) विजेतेपद जिंकले आणि २०२४ मध्ये (८८.३६ मीटर) दुसरे स्थान पटकावले होते. दोहामध्येही नीरजला पीटर्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

 

Web Title: Neeraj chopra got a big responsibility in the territorial army with this special title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 07:27 AM

Topics:  

  • Neeraj Chopra

संबंधित बातम्या

नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..
1

नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..

Neeraj Chopra चा अश्वमेध चौखूर, एक-एक साम्राज्य करतोय वश! ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक स्पर्धेचे विजेतेपद जिंकत रचला इतिहास.. 
2

Neeraj Chopra चा अश्वमेध चौखूर, एक-एक साम्राज्य करतोय वश! ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक स्पर्धेचे विजेतेपद जिंकत रचला इतिहास.. 

शेवटी वेबरला नीरज चोप्राने टाकलं मागे! गोल्डन बॉय Paris Diamond League चा चॅम्पियन
3

शेवटी वेबरला नीरज चोप्राने टाकलं मागे! गोल्डन बॉय Paris Diamond League चा चॅम्पियन

गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये! येथे पाहू शकता मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग
4

गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये! येथे पाहू शकता मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.