योगराज सिंग, विराट कोहली आणि रोहित शर्मा(फोटो-सोशल मिडिया)
Rohit sharma-Virat kohali Retirement : इंग्लंड दौऱ्यापूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना नाराज केले. अनेक दिग्गज खेळाडूंचा असा विश्वास आहे की या दोन्ही खेळाडूंमध्ये अजून देखील बराच खेळ खेळू शकले असते. ज्यावर आता माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी देखील कडक शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर योगराज सिंग यांनी प्रतिक्रिया दिलीय आहे. तसेच त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. योगराज सिंग यांचे म्हणणे आहे की, की दोघांनीही आत्ताच कसोटी क्रिकेट सोडायला नको होते. त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे वर्णन एक प्रकारची बळजबरी असे केले आहे.
रोहित आणि विराटच्या निवृत्तीबद्दल एएनआयशी बोलताना योगराज सिंग म्हणाले की, “विराट हा एक महान खेळाडू आहे, त्यामुळे तो एक निश्चितच तोटा होईल. २०११ मध्ये जेव्हा अनेक खेळाडूंना वगळण्यात आले होते, निवृत्ती घेण्यात आली किंवा निवृत्त होण्यास भाग पाडण्यात आले होते, तेव्हा संघ तुटला आणि अद्याप पुन्हा उभे राहू शकलेला नाही. पण प्रत्येकाची वेळ येत असते. मला वाटते की विराट आणि रोहितमध्ये अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे.” असे सिंग म्हणाले.
योगराज सिंह पुढे म्हणाले की, निवृत्तीपूर्वी त्यांनी त्यांचा मुलगा युवराज सिंगलाही याला देखील हाच सल्ला दिला होता. तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही पुढे चालू शकत नाही तेव्हाच मैदान सोडावे. जर संघ पूर्णपणे तरुण खेळाडूंनी भरलेला असेल तर तो नेहमीच अस्थिर राहतो. कदाचित विराटला असे वाटत असेल की त्याने सर्वकाही साध्य केले आहे, म्हणून आता निवृत्तीची वेळ आली आहे.” असे योगराज म्हणाले.
#WATCH | Chandigarh | On Indian Cricketers Virat Kohli and Rohit Sharma retiring from Test Cricket, former Indian cricketer Yograj Singh says, “Virat is a big player, so it will obviously be a loss. When many players were either removed, retired, or coerced into retirement in… pic.twitter.com/FKzd9aUOX5
— ANI (@ANI) May 14, 2025
हेही वाचा : ‘मी खास विराटसाठी कसोटी क्रिकेट…’, किंग कोहलीच्या निवृत्तीने Preity Zinta निराश! लिहिले भावुक करणारे शब्द..
योगराज सिंग यांचे मत आहे, की रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी अचानक क्रिकेट सोडले. ते म्हणाले की, “मला वाटतं रोहितला अशा एखाद्या व्यक्तीची गरज होती जो त्याला दररोज प्रेरणा देणार असेल. जसे की सकाळी ५ वाजता उठून त्याला धावण्यास सांगेल. रोहित आणि सेहवाग हे असे खेळाडू होते जे अजूनही जास्त काळ खेळू शकले असते. महान खेळाडूंनी ५० वर्षांपर्यंत खेळत राहिले पाहिजे. त्यांच्या जाण्याने, तरुणांना प्रेरणा देणारे कोणतेही आदर्श आता शिल्लक राहिले नाहीत आणि ही मोठी दुःखद गोष्ट आहे.”