रविंद्र जडेजा(फोटो-सोशल मीडिया)
ICC Ranking : एकीकडे, रोहित शर्माआणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी घेतेलेला निर्णय त्यांच्या चाहत्यांना आवडला नाही. तर दुसरीकडे, रवींद्र जडेजाने क्रिकेटच्या या सर्वात लांब आणि सर्वात जुन्या फॉरमॅटमध्ये इतिहास रचून सर्वाना आश्चर्यचकित करून टाकले आहे. जाडेजाने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने कसोटी अष्टपैलू खेळाडूंची नवीन क्रमवारी जाहीर झाली आहे. त्यामध्ये त्याने इतिहास रचला आहे.
आयसीसीने कसोटी अष्टपैलू खेळाडूंची नवीन क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे, ज्यामध्ये रवींद्र जडेजा ४०० रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. जाडेजाने रचलेला विश्वविक्रम म्हणजे तो आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या श्रेणीत सर्वाधिक दिवसांपर्यंत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिलं खेळाडू ठरला आहे.
रवींद्र जडेजाने ९ मार्च २०२२ रोजी वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकून जगातील नंबर वन टेस्ट अष्टपैलू खेळाडू बनला होता. तेव्हापासून ३८ महिने होऊन गेले तरीही रवींद्र जडेजा ११५२ दिवसांपासून सतत पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. २०२२ मध्ये जेव्हा रवींद्र जडेजा जगातील नंबर वन टेस्ट अष्टपैलू खेळाडू बनला होता, तेव्हा त्याला ही कामगिरी करण्याची दुसरी संधी मिळाली होती. कारण त्याआधी, तो ऑगस्ट २०१७ मध्ये एका आठवड्यासाठी नंबर वन या जागेवर आला होता.
ताज्या कसोटी अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी रवींद्र जडेजाची थेट स्पर्धा बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजसोबत होती, त्याचे ३२७ रेटिंग गुण आहेत. नवीन क्रमवारीत, मेहदी हसनने मार्को जॅन्सनला मागे टाकून क्रमांक 2 चे स्थान मिळवले होते. मार्को जॅन्सनने एक स्थान गमावले आहे आणि तो आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे, त्याच्या नावे २९४ रेटिंग गुण आहेत.
हेही वाचा : ‘मी खास विराटसाठी कसोटी क्रिकेट…’, किंग कोहलीच्या निवृत्तीने Preity Zinta निराश! लिहिले भावुक करणारे शब्द..
तसेच पॅट कमिन्स हा चौथ्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. तर बांगलादेशचा शाकिब अल हसन पाचव्या स्थानावर विराजमान आहे. जडेजा वगळता टॉप १० मध्ये दुसरा कोणताही अष्टपैलू खेळाडूचा समावेश नाही. त्याच्यानंतर, अक्षर पटेल कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत १२ व्या क्रमांकावर आहे.