Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEP vs ITA, T20 World Cup 2026 : वानखेडेवर इटलीच ठरली बॉस! अँथनी-जस्टिन जोडीच्या खेळीने नेपाळचा 10 विकेट्सने पराभव 

मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील १७ व्या सामन्यात इटलीने नेपाळचा १० विकेट्सने दणदणीत पराभव केला. इटलीने हे लक्ष्य १२.४ षटकातच पूर्ण केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 12, 2026 | 06:14 PM
NEP vs ITA, T20 World Cup 2026: Italy is the boss at Wankhede! Anthony-Justin duo defeats Nepal by 10 wickets

NEP vs ITA, T20 World Cup 2026: Italy is the boss at Wankhede! Anthony-Justin duo defeats Nepal by 10 wickets

Follow Us
Close
Follow Us:

NEP vs ITA, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १७ वा सामना नेपाळ आणि इटली यांच्यात खेळला गेला.  मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात इटलीने अँथनी मोस्का आणि जस्टिन मोस्का या जोडीच्या अर्धशतकांच्या जोरावर नेपाळचा १० विकेट्सने पराभव केला. टॉस गमावणारा नेपाळ संघ १९.३ ओव्हरमध्येच १२३ धावांवर गडगडला होता. इटलीने १२४ धावांच्या लक्ष्याला एकही विकेट न गमावता १२.४ षटकातच पूर्ण केले.

हेही वाचा : PSL-11 : पाकिस्तानला झटक्यांवर झटके! PSL-11 मधून अफगाण खेळाडूंनी घेतली माघार; नेमकं कारण काय?

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील १७ व्या सामन्यात इटलीने नेपाळविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि नेपाळ संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इटलीच्या गोलंदाजीसमोर नेपाळचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. परिणामी नेपाळ संघ १९.४ षटकात १२३ धावांवर गारद झाला. नेपाळ संघाकडून आरिफ शेखने सर्वाधिक २७ धावा केल्या. तर  आसिफ शेख देखील २० धावांचे योगदान दिले. इटलीकडून क्रिशन कलुगामागेने सर्वाधिक ३ विकेट्स, तर बेन मॅनेन्टीने २ विकेट्स घेतल्या. तसेच, अली हसन, जेजे स्मट्स आणि जसप्रीत सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

इटलीच्या सलामी जोडीची अभेद्य विजयी भागीदारी

नेपाळने दिलेल्या १२४ धावांचा पाठलाग करणाऱ्या इटली संघाची सुरुवात चांगली झाली. अँथनी मोस्का आणि जस्टिन मोस्का या सलामीजोडीने आक्रमक खेळ केला. या दोघांनी नेपाळच्या गोलंदाजीवर चांगलाच हल्ला चढवला आणि १२४ धावांची अभेद्य भागीदारी रचत आपल्या संघाला १० विकेट्सने विजय देखील मिळवून दिल. अँथनी मोस्काने  ३२ चेंडूचा सामना करत नाबाद ६२ धावा केल्या. यामध्ये त्याने ३ चौकार आणि ६ षटकार लगावले, तर  जस्टिन मोस्का ४४ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकरांच्या मदतीने नाबाद ६० धावा केल्या. नेपाळच्या एकाही गोलंदाजाला बळी टिपण्यात यश आले नाही. परिणामी नेपाळ(आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६) संघाला १० विकेट्सने पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा : RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा

दोन्ही संघ खालीलप्रमाणे 

इटली प्लेइंग इलेव्हन : अँथनी मोस्का, जस्टिन मोस्का, जेजे स्मट्स, हॅरी मॅनेन्टी (कर्णधार), बेन मॅनेन्टी, मार्कस कॅम्पोपियानो, ग्रँट स्टीवर्ट, जियान मीड (डब्ल्यू), जसप्रीत सिंग, क्रिशन कलुगामागे, अली हसन

नेपाळ प्लेइंग इलेव्हन : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (w), रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग आयरी, आरिफ शेख, लोकेश बाम, गुलसन झा, करण केसी, नंदन यादव, संदीप लामिछाने, ललित राजबंशी

बातमी अपडेट होत आहे.. 

Web Title: Nep vs ita t20 world cup 2026 anthony justin duo leads italy to 10 wicket win over nepal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 05:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.