Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३३ वा सामना नेपाळ आणि स्कॉटलंड यांच्यात खेळला गेला. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळ संघाने स्कॉटलंड संघाचा विकेट्सने पराभव केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 17, 2026 | 10:31 PM
NEP vs SCO, T20 World Cup 2026: Nepal beats Scotland! Defeated by wickets; Deependra Singh Airi's winning innings

NEP vs SCO, T20 World Cup 2026: Nepal beats Scotland! Defeated by wickets; Deependra Singh Airi's winning innings

Follow Us
Close
Follow Us:

EP vs SCO, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३३ व्या सामन्यात नेपाळ आणि स्कॉटलंड आमनेसामने होते.  मुंबई  येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळने स्कॉटलंडचा ७ विकेट्सने पराभव केला. स्कॉटलंड संघाने प्रथम फलंदाजी करत मायकेल जोन्सच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ गडी गमावून १७० धावा केल्या. प्रतिउत्तरात नेपाळ संघाने दीपेंद्र सिंग ऐरीच्या अर्धशतकाच्या जोरावर १९.२ षटकात १७१ धावांचे लक्ष्य गाठून विजय मिळवला. स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : Imran khan Health : ‘योग्य उपचार आणि आदर मिळावा….; इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल भारताच्या ‘दादा’कडून चिंता व्यक्त

स्कॉटलंडने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करणाऱ्या नेपाळ संघाने चांगली सुरुवात केली. कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख या सलामीवीरांनी ७४ धावांची भागीदारी रचली. कुशल भुर्तेल ४३ धावा तर आसिफ शेख ३३ धावा करून माघारी गेले. कर्णधार रोहित पौडेल १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर दीपेंद्र सिंग ऐरी आणि गुलसन झा यांनी डाव सांभाळत नेपाळ संघाचा विजय निश्चित केला. दीपेंद्र सिंग ऐरीने २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५० धावांची खेळी केली. तर गुलशन झा १७ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

स्कॉटलंड संघाचा डाव

यापूर्वी, या सामन्यात नेपाळ संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि स्कॉटलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. स्कॉटलंड संघाची सुरुवात चांगली झाली. जॉर्ज मुन्से आणि मायकेल जोन्स या सलामी जोडीने पहिल्या विकेट्ससाठी १० ओव्हरमध्ये ८० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर जॉर्ज मुन्से २७ धावा करून बाद झाला.  त्यानंतर ब्रँडन मॅकमुलेन आणि मायकल जोन्स यांनी डाव सावरत ५० धावांची भागीदारी रचली. २५ धावा करून ब्रँडन मॅकमुलेन माघारी गेला.  त्यानंतर मात्र स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.  मायकल जोन्सने शानदार अर्धशतक लगावून संघाला १७० पर्यंत पोहचवले. त्याने ४५ चेंडूत ७१ धावांची खेळी करून महत्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर तो बाद झाला. नेपाळकडून(आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६)सोमपाल कामीने सर्वाधिक ३ विकेट्स चटकावल्या आहेत.तर नंदन यादवने २ विकेट्स घेतल्या.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

स्कॉटलंड प्लेइंग इलेव्हन: जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मायकेल लीस्क, मॅथ्यू क्रॉस (कर्णधार), मार्क वॅट, ऑलिव्हर डेव्हिडसन, ब्रॅड व्हील, ब्रॅड करी

नेपाळ प्लेइंग इलेव्हन: कुशल भुर्तेल, आसिफ शेख, रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग ऐरी, आरिफ शेख, लोकेश बाम, संदीप जोरा, गुलसन झा, सोमपाल कामी, नंदन यादव, संदीप लामिछाने

Web Title: Nep vs sco t20 world cup 2026 scotland defeated by nepal by 7 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 10:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.