फोटो सौजन्य - ESPNcricinfo
स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स : भारत, इंग्लड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या दिग्गज संघांनी क्रिकेट विश्वामध्ये त्याच्या कामगिरीने अनेक पराक्रम नावावर केले आहेत. तर अफगाणिस्तान, आयर्लंड आणि नेदरलँड हे संघ अजुनही त्याचे अस्तित्व तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानच्या संघाने टी20 विश्वचषकामध्ये त्याचबरोबर अनेक मालिकामध्ये बलाढ्य संघांना पराभूत करुन जगाला चकित केले आहे. आता असच काहीस नेदरलँड्सच्या संघाने केले आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात नेदरलँड्सने एक उत्तम कामगिरी केली आहे. एका झटक्यात नेदरलँड्सने भारत आणि इंग्लंडसारख्या मोठ्या संघांना मागे टाकले आहे.
2027 मध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे, यासाठी आता सर्व संघ हे त्याच्या कामाला लागणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा फायनलचा सामना सुरु आहे याचदरम्यान आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग २०२३-२७ मध्ये नेदरलँड्सचा सामना स्कॉटलंडशी झाला. या रोमांचक सामन्यात फलंदाजांनी शानदार कामगिरी केली तर गोलंदाजांना चांगलाच फटका बसला. या सामन्यात दोन्ही संघांनी एकत्रित ७४३ धावा केल्या, पण शेवटी नेदरलँड्स जिंकले. नेदरलँड्सच्या या ऐतिहासिक विजयात मॅक्स ओ’डॉडने महत्त्वाची भूमिका बजावली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने ५० षटकांत ६ गडी गमावून ३६९ धावा केल्या. स्कॉटलंडकडून फलंदाजी करताना जॉर्ज मुन्से यांनी १५० चेंडूंत सर्वाधिक १९१ धावा केल्या. ज्यामध्ये १४ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. याशिवाय मॅथ्यू क्रॉसने ५९ धावा केल्या. यानंतर, नेदरलँड्सने ४९.२ षटकांत ६ गडी गमावून हे मोठे लक्ष्य गाठले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात, नेदरलँड्सने पहिल्यांदाच ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठले आहे. नेदरलँड्सकडून फलंदाजी करताना मॅक्स ओ’डॉडने १३० चेंडूत १५८ धावा केल्या. तेजाने ४२ चेंडूत ५१ धावा केल्या आणि नोआह क्रोजने ५० धावा केल्या.
Max O’Dowd’s sensational innings against Scotland in #CWCL2 helped Netherlands seal their second-highest run chase in ODIs 🔥#SCOvNED 📝: https://t.co/HBHkuTl5d6 pic.twitter.com/MWibkq7dZx
— ICC (@ICC) June 12, 2025
स्कॉटलंडविरुद्ध ३७० धावांचे लक्ष्य गाठून नेदरलँड्सने इंग्लंडलाही हरवले आहे. टीम इंडियाने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६० धावांचे लक्ष्य गाठले होते, तर इंग्लंडने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३६१ धावांचे लक्ष्य गाठले होते. नेदरलँड्स संघाने एकदिवसीय इतिहासातील तिसरे सर्वात मोठे लक्ष्य गाठले आहे. आतापर्यंत, दक्षिण आफ्रिका या यादीत अव्वल स्थानावर आहे, ज्याने २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४३५ धावांचे लक्ष्य गाठले होते.