फोटो सौजन्य - Proteas Men
ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका WTC फायनल सामन्याच्या दुसऱ्या दिनाचा अहवाल : ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना सुरू आहे. या फायनलच्या सामन्यांमध्ये कालपासून दुसरा इनिंगला सुरुवात झाली आहे. काल या इनिंगचा तिसरा दिवस पार पडला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चांगली सुरुवात केली होती त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्याच दावात 212 धावांवर गुंडाळलं होतं पण म्हणतात ना शेरास सव्वाशेर असंच काहीच झालं. पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करत असताना दक्षिण आफ्रिकेचे संघाने 212 धावांवर सर्व फलंदाजांना बाद केले.
दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजी करायला आल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने कमालीची खेळी दाखवली. त्याने पहिल्याच डावात सहा विकेट्स घेऊन कहर केला. आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 138 धावांवर रोखलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये दुसऱ्या दिनाचा खेळ कसा पार पडला या संदर्भात सविस्तर जाणून घ्या. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर पहिल्याच दिनी फलंदाजी करत असताना चार विकेट्स गमावले होते.
IPL 2025 मध्ये सुर हरवलेल्या Rashid Khan चा धक्कादायक निर्णय; क्रिकेटपासून स्वतःला केले अलिप्त..
दक्षिण आफ्रिकेचे सर्व फलंदाज फेल ठरले फक्त संघाचा कर्णधार टेंबा बहुमा याने 34 धावा केल्या तर बेडिंगम याने 45 धावांची खेळी खेळली याव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 चा आकडा पार करू शकला नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर पेट कमिन्स याने कमालीची खेळी दाखवली त्याने त्याच्या नावावर सहा विकेट्स केले यामध्ये त्याने वेब मुल्डर, बेडिंगम, वैरेने, मार्को जॉन्सन आणि कगिसो रबाडा यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मीचेल स्टार्क याने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले तर जॉस हेझलवूड याने संघाच्या पदरात एक विकेट टाकला.
Day 2 draws to an exciting close, with a dominant bowling display from South Africa in the final session 💪🇿🇦.
The Proteas turned the tide with disciplined pace, leaving Australia at 144/8, holding a lead of 218 runs 🔥🏏.
With the match finely poised, there’s everything to… pic.twitter.com/UNIeFKA6BS
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 12, 2025
ऑस्ट्रेलियन या तीन गोलंदाजांनी कालच्या दिनी कमालीचा खेळ दाखवला आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाला लवकर रोखले त्यामुळे संघ लीडमध्ये राहिला. सध्या ऑस्ट्रेलियन संघ हा फलंदाजी करत आहे. दुसरा दिनाच्या शेवटपर्यंत ऑस्ट्रेलियन संघ हा फलंदाजी करत होता त्यांनी दुसऱ्या गावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या दिनाच्या समाप्तीपर्यंत आठ विकेट्स कमावले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आठ विकेट्स कमावून 40 ओव्हर मध्ये 144 धावा केल्या आहेत. यासह ऑस्ट्रेलियाच्या संघाने सध्या दुसरा दिनाच्या समाप्तीनंतर 218 धावांची आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावांमधील फलंदाजीबद्दल सांगायचे झाले मार्गस लांबूशेन याने संघासाठी २२ धावा केल्या. ॲलेक्स कॅरी याने ४५ धावांची खेळी खेळली त्याव्यतिरिक्त एकही फलंदाज २० चा आकडा पार करू शकला नाही. या सामन्यात दोन्ही संघाची फलंदाजी निराशाजनक कामगिरी राहिली.