
फोटो सौजन्य : X
नेदरलँड विरुद्ध नेपाळ : नेदरलँड विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. यामध्ये दुसरा टी-20 सामना काल पार पडला. यामध्ये या दोन्ही संघाने आता इतिहासात नाव कोरल आहे. हा सामना एकदा दोन वेळा नाही तर तीन वेळा टाय झाला आहे. नेदर्लंड्स आणि नेपाळ यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात नेपाळच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात नेदरलँडच्या संघाने पहिले फलंदाजी करत 7 विकेट्स गमावून 152 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युतरात नेपाळच्या संघाने २० ओवरमध्ये ८ विकेट्स गमावले आणि १५२ धावा केल्या.
नेपाळच्या फिरकीपटूंनी, विशेषतः संदीप लामिछाने आणि ललित राजवंशी यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि नेदरलँड्सला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्यानंतर सामन्याच्या निर्णयासाठी देखील सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यामध्ये देखील सामना टाय झाला. पहिल्या सुपर ओव्हरबद्दल सांगायचे झाले तर नेपाळच्या संघाने पहिले फलंदाजी करत १९ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युतरात नेदरलँडनेही १९ धावा केल्या आणि सामना पुन्हा बरोबरीत संपला. त्यानंतर पुन्हा सामना हा दुसऱ्या सुपर ओव्हरमधे गेला.
यामध्ये देखील दोन्ही संघांनी १७ – १७ धावा केल्या सामन्यात बरोबरी झाली. हे क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच झाले आहे. तिसरा सामना या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता त्यामध्ये नेपाळच्या संघाने एकही धाव केली नाही आणि २ विकेट्स गमावले. त्यानंतर नेदरलँडच्या संघाने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून सामना जिंकला.
🚨 THE CRAZIEST T20 MATCH BETWEEN NEPAL Vs NETHERLANDS 🚨 Match – Tied.
1st Super Over – Tied.
2nd Super Over – Tied.
3rd Super Over – Netherlands Won. THIS IS JUST UNREAL MATCH IN T20 CRICKET HISTORY. 🥶🤯 pic.twitter.com/7z7ZDnM82N — Tanuj (@ImTanujSingh) June 16, 2025
या सामन्यात नेदरलँड्सकडून तेजा निदामानुरूने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३५ धावांचे योगदान दिले. विक्रमजीत सिंगने ३० धावांची खेळी केली. साकिब झुल्फिकारनेही २५ धावा केल्या. दुसरीकडे, गोलंदाजीत डॅनियल डोराम सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत १४ धावा देत ३ बळी घेतले. विक्रमजीत सिंगनेही २ बळी घेतले. जॅक लियोन-कॅचेट, बेन फ्लेचर आणि काइल क्लेन यांना १-१ यश मिळाले.